गोंदिया : बारबालासोबत नाचतानाचा आमगावचे भाजप आमदार संजय पुराम यांचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याची पक्षाने गांभिर्याने दखल घेतल्याची माहिती आहे. व्हायरल झालेली व्हिडिओ क्लिप आणि विविध वृत्तपत्रांचे कात्रण पक्षश्रेष्ठींनी मागविले असून ते घेऊन रविवारी जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी रवाना झाल्याची माहिती आहे. त्यामुळे पुराम यांची उमेदवारी संकटात आल्याची मतदारसंघात चर्चा आहे.पुराम यांनी पोलिसांत तक्रार केली असून पत्रकार परिषद घेऊन या व्हिडिओशी आपला काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे मतदारसंघातील दुसऱ्या पक्षाच्या एका माजी आमदाराची भाजप नेत्यांशी जवळीक अचानक वाढली असून त्यांना पक्षातर्फे उमेदवारीदिली जाण्याची शक्यता आहे. संबंधित माजी आमदार सध्यामुंबईला असल्याची माहितीआहे. विशेष म्हणजे २ आॅक्टोबरला त्यांच्या पक्ष प्रवेशाचीअधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.आमदाराच्या व्हायरल व्हिडिओमध्ये चार व्यक्ती दिसत आहेत. ते गोंदिया जिल्ह्यातील असून त्यात दोन जबाबदार पदाधिकारी असल्याची चर्चा आहे. तर दोन जण बांधकाम क्षेत्रातील असल्याची चर्चा सुरू आहे.
आमगावच्या भाजप आमदारावर संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 6:06 AM