मोठ्या धरणांची स्थिती : शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आकाशाकडेलोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : वाघ इटियाडोह पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या मोठ्या धरणांमध्ये ठणठणाट असून खरीप हंगासाठी शेतकऱ्यांच्या नजरा सध्या आकाशाकडे लागल्या आहेत. लवकर पाऊस आले तर शेतकऱ्यांच्या पूर्वतयारीला वेग येणार आहे. आतापर्यंत अल्पसे पाऊस आल्याने जिल्ह्यातील जलाशये तहानलेली आहेत.वाघ-इटियाडोह पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून जिल्ह्यातील मोठ्या धरणातील पाण्याच्या साठ्याबाबत माहिती मिळाली आहे. यात इटियाडोह, शिरपूर, पूजारीटोला, कालीसराड, संजय सरोवर, गोसे खुर्द, बावणथडी व धापेवाडा या मोठ्या धरणांमध्ये अल्प साठा आहे. सद्यस्थितीत ५ जूनला इटियाडोह धरणामध्ये १४.६१ टक्के (दलघमी), शिरपूरबांधमध्ये १.०१ टक्के, पूजारीटोला धरणात २४.३१ टक्के, संजय सरोवरमध्ये १.१४ टक्के, बावनथडी प्रकल्पात ८.७६ टक्के व धापेवाडा प्रकल्पात ४.१७ टक्के जलसाठा आहे. तर कालीसराड व गोसे खुर्दमध्ये जलसाठा पातळीपेक्षा कमीच आहे.तसेच मागील वर्षी २०१६ मध्ये याच तारखेत इटियाडोह १३.८३ टक्के, पूजारीटोला धरणात ७.१३ टक्के, कालीसराडमध्ये ०.५४ टक्के, गोसे खुर्दमध्ये ३७.३० टक्के व बावणथडी प्रकल्पात २.३८ टक्के जलसाठा होता. तर शिरपूरबांध, संजय सरोवर व धापेवाडा येथील जलसाठा मोजमाप पातळीपेक्षा कमी होता. आता शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.जिल्ह्यातील पर्जन्यमानाची स्थितीजिल्ह्यात ५ जून रोजी प्रत्यक्ष पडलेल्या पावसाची सरासरी शून्य असली तरी जिल्ह्यात १ ते ५ जूनपर्यंत सरासरी ५.२० मिमी पाऊस झाले आहे. यात गोंदिया तालुका शून्य, गोरेगाव १७ मिमी, तिरोडा शून्य, अर्जुनी-मोरगाव ८.६० मिमी, देवरी शून्य, आमगाव १५.२० मिमी, सालेकसा शून्य, सडक-अर्जुनी १ मिमी असा जिल्ह्यात एकूण सरासरी ५.२० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील धरणे तहानलेलीच
By admin | Published: June 06, 2017 1:00 AM