कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सणवार अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 09:25 PM2019-03-22T21:25:29+5:302019-03-22T21:25:51+5:30

नगर परिषदेत एका एजंसीच्या माध्यमातून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील पाच-सहा महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. परिणामी, कंत्राटी कर्मचारी अडचणीत असून त्यांचे सणवार अंधारात दिसून येत आहेत.मात्र यानंतरही नगर परिषदेकडून सदर एजंसीवर कुठली कारवाही करण्यात आली नसून उलट अभय दिले जात आहे.

In the dark of the Contract Employees | कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सणवार अंधारात

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सणवार अंधारात

Next
ठळक मुद्देसंवेदनाहीन पालिका प्रशासन : सहा महिन्यापासून कंत्राटी कर्मचारी वेतनाविना

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगर परिषदेत एका एजंसीच्या माध्यमातून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील पाच-सहा महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. परिणामी, कंत्राटी कर्मचारी अडचणीत असून त्यांचे सणवार अंधारात दिसून येत आहेत.मात्र यानंतरही नगर परिषदेकडून सदर एजंसीवर कुठली कारवाही करण्यात आली नसून उलट अभय दिले जात आहे.
नगर परिषदेत एका एजंसीच्या माध्यमातून विविध विभागांत कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रोजी रोटीसाठी हे कर्मचारी इमानदारीने काम करीत आहे. मात्र त्यांचे मागील पाच-सहा महिन्यांपासून पगार देण्यात आले नाही. नगर परिषदेची आर्थिक स्थिती हलाखीची असताना एखाद्यावेळेस पगार मागे-पुढे होणे या कर्मचाऱ्यांनाही मान्य आहे. मात्र पाच-सहा महिने पगार होत नसल्याने कर्मचाºयांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे.
विशेष म्हणजे, मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या एजंसीची नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार करण्याची आर्थिक स्थिती नसताना त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी नियुक्त करण्याचे अधिकार कसे काय देण्यात आले हा मुद्दा देखील उपस्थित केला जात आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुळ वेतनापेक्षा पाच ते सात हजार रुपये कमी दिले जात असताना एजंसीवर कारवाही करण्याऐवजी नगर परिषदेचे पदाधिकारी व जिल्हा प्रशासन सुध्दा गप्प राहण्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मागील पाच-सहा महिन्यांपासून पगार नसल्याने या कर्मचाऱ्यांवर उधार-उसनवारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे. एवढा गंभीर प्रकार नगर परिषदेत घडत असताना कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी कुणीही काहीच करीत नसल्याने नगर परिषद प्रशासन संवेदनाहिन झाल्याचेही हे कर्मचारी बोलत आहेत. पुढे नवरात्र, रामनवमी व गुढीपाडवा हे सण असून हे सुद्धा अंधारातच दिसून येत आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कुणीच वाली नाही
नगर परिषेदेचे कामकाज चालविण्यासाठी कंत्राटी कर्मचारी काम करीत असताना त्यांच्या पगारासाठी कुणीही काहीच करीत नसल्याचे चित्र आहे. मुख्याधिकारी बेमुदत रजेवर गेले असून त्यांच्या आशिर्वादानेच हे सर्व काही होत असल्याचे कर्मचारी बोलत आहेत. शिवाय पदाधिकारीही डोळे मिटून आहेत. तर दुसरीकडे कंत्राटदार कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून कामावरून काढण्याची धमकी देत आहे. अशात मात्र कर्मचाऱ्यांचा कुणीच वाली नाही. मात्र वेळीच यावर तोडगा न काढल्यास हे प्रकरण नगर परिषदेवर शेकण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी घेणार का दखल
नगर परिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या होत असलेल्या आर्थिक शोषणाबाबत लेखी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे पुराव्यांसह केली होती. मात्र अद्यापही कंत्राटदारावर कारवाही करण्यात आली नाही. त्यामुळे आतातरी जिल्हाधिकारी याची दखल घेणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Web Title: In the dark of the Contract Employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.