शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"! धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप
2
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
3
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
4
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
5
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
6
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
7
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
8
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
9
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
10
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
11
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
12
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
13
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
14
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
15
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
16
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
17
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
18
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
19
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
20
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...

डोंगरगड-बल्लारशाह मार्गावर रेल्वेगाडीची मागणी

By admin | Published: September 14, 2014 12:01 AM

गोंदिया-चंद्रपूर व गोंदिया-डोंगरगड रेल्वेमार्गाचा परिसरातील गोरगरीब आणि सर्वसाधारण प्रवाश्यांसाठी मोठा आधार आहे. मात्र दुपारीपाळीत या मार्गावर रेल्वेगाडीची सोय नसल्याने या भागातील नागरिकांना

सौंदड : गोंदिया-चंद्रपूर व गोंदिया-डोंगरगड रेल्वेमार्गाचा परिसरातील गोरगरीब आणि सर्वसाधारण प्रवाश्यांसाठी मोठा आधार आहे. मात्र दुपारीपाळीत या मार्गावर रेल्वेगाडीची सोय नसल्याने या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. येणाऱ्या नवरात्रीत वाढणारी प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने गोंदिया-चंद्रपूर (बल्लारशाह) व गोंदिया-डोंगरगड मार्गावर अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. गोंदिया-चंद्रपूर मार्गावर चंद्रपूर येथे प्रसिध्द कालीमातेचे मंदिर आहे. गोंदिया-डोंगरगढ मार्गावर डोंगरगड येथे प्रसिध्द बम्लेश्वरी मातेचे देवस्थान आहे. या दोन्ही ठिकाणी मातेचे दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी जातात. त्यांच्यासाठी नवरात्री उत्सवादरम्यान चंद्रपूर-डोंगरगड व डोंगरगढ-चंद्रपूर रेल्वेगाडी चालविण्यात यावी जेणेकरून महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगढ राज्यातील लाखो भाविक भक्तांना दर्शनाचा लाभ घेण्याची सोय उपलब्ध होईल, अशी रेल्वे प्रवाशांची अपेक्षा आहे. गोंदिया हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. आठही तालुक्यात गोंदिया हे मध्यभागी असल्याने विविध कामासाठी जिल्हावासीयांना गोंदियाला यावे लागते. काम आटोपल्यावर मात्र गावाला जाण्यासाठी दुपार पाळीत गाडी नसल्याने गोरेगाव, सडक/अर्जुनी, सौंदड, पांढरी, नवेगावबांध, अर्जुनी/मोरगाव, वडेगाव, अरुणनगर, वडसा येथील नागरिकांना व विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. हीच अवस्था गोंदिया-दर्रेकसा परिसरातील नागरिकांची आहे.