मुदतबाह्य इंजेक्शनचा शोध घेणार गुप्तहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 09:04 PM2019-05-10T21:04:52+5:302019-05-10T21:05:26+5:30

येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात जेंटामायसीन मुदतबाह्य इंजेक्शन आढळल्याचा प्रकार वीस दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. यानंतर यासाठी दोन चौकशी समिती गठीत करण्यात आल्या होत्या. या समितीने हे इंजेक्शन रुग्णालयातील नसून बाहेरील असल्याचा अहवाल दिला.

Detective detectives will be searching for an injection | मुदतबाह्य इंजेक्शनचा शोध घेणार गुप्तहेर

मुदतबाह्य इंजेक्शनचा शोध घेणार गुप्तहेर

Next
ठळक मुद्देकेटीएस रुग्णालयातील प्रकार : बाहेरील औषधी आत कशी, चौकशी समितीने दिला अहवाल, औषधसाठा मिस मॅच

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात जेंटामायसीन मुदतबाह्य इंजेक्शन आढळल्याचा प्रकार वीस दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. यानंतर यासाठी दोन चौकशी समिती गठीत करण्यात आल्या होत्या. या समितीने हे इंजेक्शन रुग्णालयातील नसून बाहेरील असल्याचा अहवाल दिला. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी या इंजेक्शनचा शोध घेण्यासाठी रूग्णालयातीलच काही वैद्यकीय अधिकाऱ्यांची गुप्तहेर म्हणून नियुक्ती केली असून ते याचा शोध घेणार आहे.
केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मुदतबाह्य इंजेक्शन आढळल्याचा प्रकार नगरसेवक लोकेश यादव यांनी उघडकीस आणला होता. त्यामुळे संपूर्ण रुग्णालयात खळबळ उडाली होती.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व्ही.पी.रुखमोडे यांनी दोन सदस्यीय चौकशी समिती नेमली. या प्रकरणाचे गांर्भिय ओळखत जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी याची चौकशी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. या समितीने केटीएस रुग्णालयाला भेट देवून रुग्णालयातील औषध साठ्याची पाहणी केली. त्यानंतर या संपूर्ण प्रकाराचा चौकशी अहवाल मंगळवारी(दि.७) जिल्हाधिकारी बलकवडे यांच्याकडे सोपविला. त्यात केटीएस रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आढळलेले मुदतबाह्य इंजेक्शन हे रुग्णालयातील नसून बाहेरील आहे. या इंजेक्शनवरील बॅच नंबर आणि रुग्णालयातील इंजेक्शनचे बॅच नंबर हे वेगळवेगळे आहे. शिवाय रुग्णालयाला पुरवठा करण्यात येणाºया इंजेक्शनवर नॉट फॉर सेल असे लिहिले असते आणि त्याच्यावर किमत सुध्दा नसते. त्यामुळे हे इंजेक्शन रुग्णालयातील नसून बाहेरुन आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता रूग्णालयातील अतिदक्षता विभागात हे मुदतबाह्य इंजेक्शन पोहचलेच कसे याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे याची चौकशी करण्यासाठी अधिष्ठाता रुखमोडे यांनी रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांची गुप्तहेर म्हणून नियुक्ती करुन या प्रकाराचा उलगडा करण्याची जबाबदारी सोपविली असल्याची माहिती आहे.
रुग्णालयात इंजेक्शन पोहचविणाऱ्यावर फौजदारी कारवाई
केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात मुदतबाह्य इंजेक्शन पोहचविल्याचा गंभीर प्रकाराच्या चौकशीनंतर हे इंजेक्शन बाहेरूनच रुग्णालयात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अतिदक्षता विभागात मुदतबाह्य इंजेक्शन पोहचविणाऱ्याचा शोध घेणे सुरू असून तो व्यक्ती सापडल्यास त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
बॅच नंबर आणि नॉट फार सेलवरुन फुटले बिंग
केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाला ज्या कंपनीतंर्गत औषधाचा पुरवठा केला जातो. त्या औषधाची बाहेर विक्री होवू नये यासाठी त्यावर नॉट फार सेल असे लिहिले असते.तसेच पुरवठा करण्यात येणाºया औषधांचा साठ्याला विशिष्ट बॅच क्रमांक दिलेला असतो. त्यामुळे औषध रुग्णालयातील आहे किंवा बाहेरचे हे सहज ओळखता येते. यासर्व गोष्टींवरुच मुदतबाह्य इंजेक्शनचे बिंग फुटले.
सीसीटीव्हीसह आता अधिकाऱ्यांचे लक्ष
केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात मुदतबाह्य इंजेक्शन आढळल्यानंतर रुग्णालय प्रशासन खळबळू जागे झाले आहे. मुदतबाह्य इंजेक्शन हे बाहेरुन आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रुग्णालय व्यवस्थापनाने आता बारीक नजर ठेवली आहे. सीसीटीव्हीसह विशिष्ट अधिकाऱ्यांचे सुध्दा यासर्व प्रकारवर लक्ष राहणार आहे.

केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मुदतबाह्य इंजेक्शन आढळल्याच्या प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करण्यात आला. त्यात हे इंजेक्शन बाहेरुन आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहे.
- व्ही.पी.रुखमोडे, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया.

Web Title: Detective detectives will be searching for an injection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.