लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ३७ विषयांना घेऊन बोलाविण्यात आलेल्या नगर परिषदेच्या सर्व साधारण सभेत गुरूवारी (दि.२७) विषय सूचीतील सोडून अन्य विषयांवर चर्चा रंगली. अशात कार्यालयीन वेळ झाल्याने सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे आता शुक्रवारी (दि.२८) सभा बोलाविण्यात आली असून सूचीतील विषयांवर चर्चा होणे अपेक्षीत आहे. नगर परिषदेच्या विविध विभागांतील घेऊन अशा विषयांवर सर्वसाधारण सभा गुरूवारी बोलाविण्यात आली होती. मात्र या सभेत विषय सूचीत देण्यात आलेले विषय चर्चेत घेण्यात आलेच नाही.तर बांधकाम समिती सभापती धर्मेश अग्रवाल यांनी शहरातील अतिक्रमण तसेच नगर परिषद मालमत्तेचे फेरफार करणे, झालेले अतिक्रमण काढून मालमत्तेवर कब्जा करणे हा विषय मांडला.दलीत वस्तीतील पेंडींग कामांचा विषय घनशाम पानतवने यांनी मांडत शहरात लावण्यात आलेल्या एलईडीचा विषयही मांडला. यात नगर परिषद वीज विभागाने शहरातील संपूर्ण खांब तसे लावण्यात आलेल्या एलईडींची मोजणी करण्यासह सर्वेक्षण करण्याची मागणी केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, दुपारी १२.३० वाजतादरम्यान सुरू झालेल्या या सभेत सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत दलीत वस्तीतील कामे व एलईडीच्या विषयावरच चर्चा झाली. अखेर कार्यालयीन वेळ झाल्याने विरोधी पक्षातील सदस्यांनी सभा तहकूब क रण्याची मागणी केली. यावर नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी सभा तहकूब केली. त्यामुळे आता विषय सूचीतील विषयांवर शुक्रवारी (दि.२८) चर्चा होणार आहे.नगर परिषद प्रशासनाविरोधात ओरडसर्वसाधारण सभेत विषयसूचीतील विषय वगळण्यात आले असता अन्य विषयांवरच पूर्ण दिवस गेला.सभेत मात्र सदस्यांनी नगर परिषद प्रशासनाच्या कारभारावर चांगलाच रोष व्यक्त केला. नगर परिषदेचा कारभार सुरळीत चालत नसल्याचा ठपका ठेवत सर्वच सदस्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
सूचीतील सोडून अन्य विषयांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 10:01 PM
३७ विषयांना घेऊन बोलाविण्यात आलेल्या नगर परिषदेच्या सर्व साधारण सभेत गुरूवारी (दि.२७) विषय सूचीतील सोडून अन्य विषयांवर चर्चा रंगली. अशात कार्यालयीन वेळ झाल्याने सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे आता शुक्रवारी (दि.२८) सभा बोलाविण्यात आली असून सूचीतील विषयांवर चर्चा होणे अपेक्षीत आहे.
ठळक मुद्देसर्वसाधारण सभा झाली तहकूब : आज पुन्हा विषयांवर चर्चा