पांढरी परिसरात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:28 AM2018-03-29T00:28:50+5:302018-03-29T00:28:50+5:30

मागील काही दिवसांपासून पाण्याच्या शोधात मुरदोली, जांभळी, झुरकुटोला या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. मंगळवारी (दि.२७) मुरदोली येथून एक बिबट्या झुरकुटोला गावाकडे पळून गेला.

Dishy panic in the white area | पांढरी परिसरात बिबट्याची दहशत

पांढरी परिसरात बिबट्याची दहशत

googlenewsNext
ठळक मुद्देबंदोबस्त करण्याची मागणी : झुरकुटोला, मुरदोली मध्ये भीतीचे वातावरण

ऑनलाईन लोकमत
पांढरी : मागील काही दिवसांपासून पाण्याच्या शोधात मुरदोली, जांभळी, झुरकुटोला या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. मंगळवारी (दि.२७) मुरदोली येथून एक बिबट्या झुरकुटोला गावाकडे पळून गेला. हा बिबट्या या भागातील काही गावकऱ्यांना दिसला. त्यामुळे या परिसतील गावकºयांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
प्राप्त माहितीनुसार मंगळवारी सकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान मुरदोली येथील सुरज डहाके यांच्या एका बिबट्याने घरात प्रवेश करुन तब्बल सहा तास घरात बस्तान मांडले होते. त्यानंतर वन आणि वन्यजीव विभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी सहा तास शर्तीचे प्रयत्न केले. मात्र बिबट्याने वन विभागाच्या कर्मचाºयावर हल्ला करुन झुरकुटोला जंगलाच्या दिशेने पळ काढला. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्याचा वनविभागाचा प्रयत्न फसला. दरम्यान पळून गेलेला बिबट्या मुरदोली व पांढरी परिसरात बुधवारी (दि.२८) दिसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. झुरकुटोला शेत शिवारामध्ये बिबट्याचे ठसे दिसले. गावकऱ्यांनी याची माहिती वनक्षेत्र सहायक जाधव यांना दिली. यानंतर या भागाला भेट देऊन पाहणी केली असता बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले. त्यामुळे झुरकुटोला येथील गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त लावण्याची मागणी ओमप्रकाश कटरे, हिवराज सयाम, विजय धुर्वे, प्रकाश टेकाम, मुन्ना वरखडे, कुवरलाल मरस्कोल्हे यांनी केली आहे.

Web Title: Dishy panic in the white area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.