तहसीलदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांची अवहेलना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2016 01:52 AM2016-03-03T01:52:42+5:302016-03-03T01:52:42+5:30
पिडीत शेतकऱ्याला मानसिक, शारीरीक व आर्थिक पिळवणूकीत झालेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाई देण्यात यावे व यासंबंधी अशी कोणती कारवाई करण्यात आली.
गोंदिया : पिडीत शेतकऱ्याला मानसिक, शारीरीक व आर्थिक पिळवणूकीत झालेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाई देण्यात यावे व यासंबंधी अशी कोणती कारवाई करण्यात आली. याबद्दल खुलासा जिल्हाधिकाऱ्याने तहसीलदाराला मागितले असता दोन महिन्याचा कालावधी लोटूनही अद्याप पिडीत शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळालेली नाही.
यासंदर्भात त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा न्यायालयात सदर प्रकरणी दावा ठोकण्यात येईल व होणाऱ्या खर्चाची जवाबदारी सर्वस्व जिल्हाधिकारी गोंदिया, तहसीलदार आमगाव, मंडळ अधिकारी (रेव्हनु) तिगाव, धोबीटोला, त.सा.क्र. १७ येथील तलाठी राधेलाल साधु वट्टी रा. धोबीटोला यांची असेल असे शेतकरी पारधी यांच्या न्यायालयीन अधिवक्त्याद्वारे नोटीस देऊन कळविले आहे.
पिडीत शेतकऱ्याचे नाव रेवाजी फुलीचंद पारधी रा. सिव्हील लाईन वार्ड क्रं. २ असून हे प्रकरण शेतीवादाचे आहे. पारधी यांच्या मालकीची जागा धोबीटोला येथे त.सा.क्र.१७ येथील खाता क्र. १२५ कास्तकारी जमीन गट न. १८१ आराजी १.११ आर.म्हणजे जवळपास पावने तीन एकर शेती आहे व शेतीला लागूनच राधेलाल वट्टी यांची गट क्रं. १८६ मध्ये शेती आहे. पण वट्टी यांनी लोभाने व हेपुपुरस्सर पारधी यांची गट १८१ मधील काही जागेत जुलै २०१४ मध्ये धान पेरले. त्यामुळे पारधी यांनी नोव्हेंबर २०१४ मध्ये ते धान्य कापले व येथून वादाची ठिणगी निर्माण झाली. धान्य कापले म्हणून वट्टी यांनी पोलीस स्टेशनचा धाक दाखवून एक हजार रुपयाचा दंड पारधी यांना आकारण्यात आले. तेव्हापासून न्यायासाठी तलाठी मंडळ अधिकारी व तहसीलदार यांच्या जवळ सतत ७ महिने भटकले. पारधी यांची तहान, भुख, रोजी हरवली पण हक्कासाठी मागे फिरले नाही. आपलीच जागा असून न्यायासाठी तहसीलदार, तलाठी, लोगराज गोपीचंद वासनिक व तलाठी मंडळ अधिकारी कोरे यांनी सतत शारीरिक, मानसिक व आर्थिक पिळवणूक केल्यामुळे नुकसान भरपाईची मागणी रेवाजी पारधी यांनी केली आहे. त्वरीत नुकसान भरपाई न मिळाल्यास त्यांच्याविरूध्द न्यायालयीन दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे.