विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके वितरित करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:33 AM2021-09-15T04:33:52+5:302021-09-15T04:33:52+5:30

गोंदिया : मागासवर्गीय शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी १३ सप्टेंबरला कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके यांच्या नेतृत्वात गटशिक्षणाधिकारी ...

Distribute school textbooks to students () | विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके वितरित करा ()

विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके वितरित करा ()

Next

गोंदिया : मागासवर्गीय शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी १३ सप्टेंबरला कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके यांच्या नेतृत्वात गटशिक्षणाधिकारी जनार्दन राऊत पं. स. गोंदिया यांच्याकडे निवेदन देण्यात आले. गटशिक्षणाधिकारी यांना भारतीय संविधान उद्देशिका भेट देण्यात आली. सर्व समस्या निकाली काढण्याचे आश्वासन राऊत यांनी दिले.

निवेदनातून नाम निर्देशन अर्ज गोळा करून वारसदारांची नोंद सेवापुस्तकात घेणे, सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षकांची सेवानिवृत्त फाईल, जि. प. शिक्षकांच्या सेवा पुस्तकात सहावे व सातवे वेतन आयोगाच्या मंजुरीसाठी जि.प. येथे पाठविण्यात यावे, विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके वितरित करण्यात यावे, सर्व विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप देण्यात यावी, गणवेश वितरित करण्यात यावा, शिक्षकांचे वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव, कार्योत्तर परीक्षा परवानगी,उच्च परीक्षेला बसण्याची परवानगी अर्ज, हिंदी, मराठी सूट प्रस्ताव, अस्थायी शिक्षकांना स्थायी करण्याचे प्रस्ताव, शिक्षकांचे प्रलंबित वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके जि.प. गोंदिया येथे पाठविण्यात यावे. भविष्य निर्वाह निधी पावती, डीसीपीएस कपातीचा हिशेब देण्यात यावा, सेवानिवृत्त शिक्षकांचे पेन्शन विक्री अंश राशीकरण वेळेवर देण्यात यावे, दरवर्षी गोपनीय अहवालाची प्रत शिक्षकांना देण्यात यावी, सेवा पुस्तकात संबंधित नोंदी घ्याव्या, दर महिन्याच्या एक तारखेला सेवानिवृत्त वेतन देण्यात यावे, सेवानिवृत्ती प्रकरणे ६ महिन्यापूर्वी जि.प.ला पाठविणे, अर्जित रजा प्रकरणे व वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके त्वरित काढण्यात यावे, सेवानिवृत्त शिक्षकांची संगणक परीक्षा वसुली थांबविण्यात यावी, चर्चेची कार्योत्तर प्रत संघटनेला अवलंब देण्यात यावी, अशा अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळात कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, गोंदिया तालुकाध्यक्ष विरेंद्र भोवते, सरचिटणीस अजय शहारे, अमित गडपायले, उत्क्रांत उके, मनोज गणवीर, अमित घावळे, हेमकृष्ण टेंभूर्णे, सचिन धोपेकर, भुमेश्वर कटरे, आय.डी. खोब्रागडे उपस्थित होते.

Web Title: Distribute school textbooks to students ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.