आॅनलाईन लोकमतसालेकसा : आदिवासी समाजाच्या सुप्रसिद्ध कचारगड यात्रेला यंदा जत्रेचे स्वरुप आले असून पाच दिवस चालणाऱ्या कचारगड यात्रेत सहाव्या दिवशीही भाविक व पर्यटकांचे येणे-जाणे सुरुच राहिले. संपूर्ण कचारगड यात्रा सुरक्षित, सुव्यवस्थीत चालली असून यात स्थानिक समितीला शासन, प्रशासन स्तरावर तसेच देशातील विविध राज्यातील स्वसेवी संस्था आणि व्यक्ती स्वरुपात भरपूर सहकार्य मिळाले. त्यामुळे प्रत्येक यात्रेकरु भाविकांना ही कचारगड यात्रा सुखरुप, आनंददायी व सोयीची वाटली.शेवटच्या दिवशी धनेगाव येथे समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. सकाळच्या सत्रात कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी गडचिरोलीचे आ. डॉ. देवराव होळी होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ता अनुप गेडाम व इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी माजी शिक्षण मंत्री पुरके यांनी, विविध विषयांवर मार्गदर्शन करीत गोंडी संस्कृती ही सर्वात जुनी संस्कृती असून या संस्कृतीच्या जीवन पद्धतीमध्ये शास्वत टिकाऊपणा दडलेला आहे. हे या आजच्या पिढीला समजून घेणे अति आवश्यक असल्याचे सांगीतले.सायंकाळी समारोपीय कार्यक्रमाची घोषणा नगराध्यक्ष विरेंद्र उईके यांच्या द्वारे करण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी जि.प. सभापती सविता पुराम होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून देवस्थान समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे, सचिव संतोष पंधरे, कोषाध्यक्ष बारेलाल वरखडे, ज्येष्ठ मार्गदर्शक शंकर मडावी, उपाध्यक्ष रमनलाल सलाम, माजी पं.स. उपसभापती मनोड इळपाते, भाजप महामंत्री राजेंद्र बडोले, विरज उईके, भोजराज सयाम, सुखलाल मडावी, गुलाब धुर्वे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. समारोप कार्यक्रमात यात्रेदरम्यान करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांबद्दल आढावा सादर करण्यात आला व येणाºया काळात भाविकांना आणखी उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याची ग्वाही देण्यात आली.दीड लाख लोकांनी घेतला मोफत भोजनाचा लाभपाच दिवसीय कचारगड यात्रेदरम्यान कचारगड देवस्थान समितीने भाविकांसाठी मुफ्त भोजनाची सोय केली होती. यात आमगाव क्षेत्राचे आ. संजय पुराम आणि विविध राज्यातील स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिला. त्यामुळे भाविकांसाठी भरपूर भोजन व्यवस्था करण्यात आली. माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके, आ. संजय पुराम यांनीही भाविकांना जेवण वाढण्याचे काम केले. भोजन समितीच्या सक्रिय परिश्रमामुळे भोजन व्यवस्था सुरळीत चालली. भोजन समितीचे अध्यक्ष संतोष मडावी आणि इतर सदस्यांनी प्रत्येक भाविकांना भोजन मिळावे यासाठी जातीने लक्ष दिले.
सुरळीत पार पडली धनेगाव-कचारगड यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 9:40 PM
आदिवासी समाजाच्या सुप्रसिद्ध कचारगड यात्रेला यंदा जत्रेचे स्वरुप आले असून पाच दिवस चालणाऱ्या कचारगड यात्रेत सहाव्या दिवशीही भाविक व पर्यटकांचे येणे-जाणे सुरुच राहिले.
ठळक मुद्देधनेगावात समारोपीय कार्यक्रम : सहा दिवसीय यात्रेला जत्रेचे स्वरूप