गुड न्यूज मेडिकलच्या इमारत बांधकाम निधीचा मार्ग सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 05:00 AM2021-04-28T05:00:00+5:302021-04-28T05:00:22+5:30

जवळपास पाच वर्षांचा कालावधी लोटला मात्र, अद्यापही मेडिकलची इमारत तयार करण्यात आली नाही. त्यामुळे मेडिकलचा कारभार सध्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या इमारतीतून सुरू आहे. यामुळे बऱ्याच समस्या येत आहेत. मेडिकलचे बरेच विभाग जागा नसल्याने सुरू करण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे रुग्णांनासुद्धा मेडिकल कॉलेजचा फारसा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. 

Ease of way for Good News Medical's building construction fund | गुड न्यूज मेडिकलच्या इमारत बांधकाम निधीचा मार्ग सुकर

गुड न्यूज मेडिकलच्या इमारत बांधकाम निधीचा मार्ग सुकर

googlenewsNext
ठळक मुद्दे६८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर : प्रशासकीय मंजुरी प्राप्त : दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यास होणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होऊन इमारत बांधकामासाठी ४४८ कोटी रुपयांचा निधी २०१६ मध्ये मंजूर करण्यात आला होता. मात्र, इमारत बांधकामासाठी हा निधी अपुरा पडत असल्याने अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे मेडिकलच्या बांधकामाला गती प्राप्त झाली नव्हती. मात्र, मंगळवारी राज्य शासनाने मेडिकलच्या इमारत बांधकामासाठी ६८९ कोटी रुपयांच्या अंदाज पत्रकाला प्रशासकीय मंजुरी बहाल केली आहे. त्यामुळे मेडिकलच्या इमारतीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. 
गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर जवळपास पाच वर्षांचा कालावधी लोटला मात्र, अद्यापही मेडिकलची इमारत तयार करण्यात आली नाही. त्यामुळे मेडिकलचा कारभार सध्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या इमारतीतून सुरू आहे. यामुळे बऱ्याच समस्या येत आहेत. मेडिकलचे बरेच विभाग जागा नसल्याने सुरू करण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे रुग्णांनासुद्धा मेडिकल कॉलेजचा फारसा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. 
मेडिकलच्या डॉक्टर आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा यामुळे विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कुडवा परिसरात मेडिकल कॉलेजच्या इमारतीसाठी प्रशस्त जागासुद्धा मंजूर करण्यात आली आहे. मात्र, काही अडचणींमुळे हे बांधकाम रखडले होते. 
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर खा. प्रफुल्ल पटेल यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्र्यासह, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत चर्चा करून वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनीसुद्धा गोंदिया येथे भेट देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होेते. त्यानंतर मंगळवारी राज्य शासनाने गोंदिया मेडिकल कॉलेजच्या इमारत बांधकामाच्या नवीन प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. यासाठी ६८९ कोटी ४६ लाख ८१ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे मेडिकलच्या इमारत बांधकामाला आता युद्धपातळीवर सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

प्रवेशाची क्षमता १५० जागांवर 
गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. सुरुवातीला ५० विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेला मंजुरी देण्यात आली होती. आता ती १५० करण्यात आली आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा याची मदत होणार आहे. 
६५० खाटांची असणार क्षमता 
शहरातील कुडवा परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. यासाठी ६८९ कोटी ४६ लाख रुपयांच्या प्रशासकीय अंदाजपत्रकास शासनाने मंजुरी दिली आहे. एकूण ६५० खाटांचे हे रुग्णालय असणार आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना आराेग्याच्या दर्जेदार सुविधा मिळण्यास मदत होणार असून, नागपूरपर्यंत करावी लागणारी पायपीटसुद्धा करावी लागणार नाही. 

गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूृर करण्यात आले. मात्र, राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने याकडे दुर्लक्ष केले होते; पण जिल्हावासीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत होतो. आता ६८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने मेडिकलच्या इमारतीचा मार्ग माेकळा झाला आहे. 
-प्रफुल्ल पटेल, खासदार

 

Web Title: Ease of way for Good News Medical's building construction fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.