आठ तोतया शिक्षकांनी उचलले २५ लाखांचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 12:31 AM2018-06-07T00:31:41+5:302018-06-07T00:31:41+5:30

 Eight disciplined teachers raised 25 lac loans | आठ तोतया शिक्षकांनी उचलले २५ लाखांचे कर्ज

आठ तोतया शिक्षकांनी उचलले २५ लाखांचे कर्ज

Next
ठळक मुद्देकंपनीच्या कर्मचाऱ्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल : जिल्ह्यात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बजाज फिनसव्हर्स कंपनीच्या एका कर्मचाऱ्यांच्या मदतीने कर्जाची उचल करण्यासाठी आठ जणांनी स्वत:ला शिक्षक असल्याचे दाखवून त्यासाठी खोटे पगार पत्रक तयार केले. या खोट्या पगार पत्रकाच्या आधारे २५ लाख २९ हजारांची उचल करणाऱ्या त्या तोतया आठ शिक्षकांसह बजाज कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंदिया येथील चांदणी चौकातील सारासार कॉम्प्लेक्स पोद्दार स्टीलजवळ दुसºया माळ्यावर बजाज फिनसव्हर्स कंपनीचे आॅफिस आहे. येथे उमेश जांभूळकर नावाच्या व्यक्तीने आठ लोकांना कर्ज मिळवून देण्यासाठी त्यांना तोतया शिक्षक बनविले. यासाठी त्याने खोटे पगार पत्रक, ओळखपत्र व कागदपत्रे तयार केली. सप्टेंबर ते डिसेंबर २०१७ या दरम्यान हा प्रकार घडला.
गोंदियातील ललीत बलीराम अगाडे, राजेश सेवकराम राऊत, मनोज पोलीराम डोंगरे, लोकेश प्रभाकर ढोमणे, बबीता प्यारेलाल सोनवाने, भरतलाल चैनलाल पारधी, प्रशांतकुमार बिसेन कोचे, शिवलाल सूजरलाल मंडीये या आठ लोकांना आरोपी उमेश जांभूळकर यांनी शिक्षक असल्याचे दाखविले. त्यांचे खोटे पगार पत्रक तयार करुन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खोटे स्टेटमेंट व शाळेचे खोटे ओळखपत्र दाखवून बजाज फिनसव्हर्स कंपनीकडून २५ लाख २९ हजार रुपये रकमेच्या कर्जाची उचल केली. दरम्यान उचल केलेल्या कर्जाच्या रक्कमेचा आकडा अधिक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात राकेश विठ्ठलराव बनकर (३२) यांच्या तक्रारीवरुन गोंदिया शहर पोलिसांनी सदर आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ४०६, ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मोठे घबाड उघडकीस येण्याची शक्यता
तोतया शिक्षकांच्या नावावर बजाज फिनसव्हर्स कंपनीतून कर्जाची उचल करण्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शिवाय उचल केलेल्या कर्जाचा आकडा २५ लाख रुपयांपेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे यातील मोठे घबाड उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हप्ते थकल्याने फुटले बिंग
ज्या तोतया शिक्षकांनी बजाज फिनसव्हर्स कंपनीतून कर्जाची उचल केली. मात्र त्यानंतर त्यांनी उचल केलेल्या कर्जाचे हप्ते नियमित भरले नाही. कर्जाची उचल केल्यापासूनच हप्ते थकल्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी रिकव्हरीसाठी सदर तोतया शिक्षकांनी दिलेल्या पत्तावर जाऊन चौकशी केली तेव्हा या नावाचे कुणीही शिक्षक नसल्याची बाब उघडकीस आली. त्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले.

Web Title:  Eight disciplined teachers raised 25 lac loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक