विद्या निकेतन महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:33 AM2021-09-15T04:33:43+5:302021-09-15T04:33:43+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. एस. टेंभुर्णे होते. प्रा. एम. एम. हाडोळे, प्रा. एस. डी. पटले, प्रा. पी. एम. ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. एस. टेंभुर्णे होते. प्रा. एम. एम. हाडोळे, प्रा. एस. डी. पटले, प्रा. पी. एम. मानापुरे, प्रा. विणा
लिल्हारे उपस्थित होते. स्पर्धा 'देशाच्या विकासात शिक्षकांचे योगदान' व 'शिक्षक : समाजपरिवर्तनाचे माध्यम' या विषयांवर घेण्यात आली. स्पर्धेत कला, वाणिज्य, विज्ञान व एचएससी - व्होकेशनलच्या सर्व प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन शालेय अध्यापनातून विद्यार्थी घडविता घडविता समाज व देश विकासात शिक्षकांची भूमिका विविधांगी कशी असावी, यावर साधकबाधक विचार आपल्या वक्तृत्त्वातून व्यक्त केले. याप्रसंगी प्राचार्य डी. एस. टेंभुर्णे यांनी, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासारख्या महान शिक्षकांचा व राष्ट्रसेवकांचा आदर्श बाळगून शिक्षकांनी देश विकासाचे व समाजपरिवर्तनाचे कार्य करावे, असे सांगितले. रासेयो समन्वयक प्रा. जी. बी. तरोणे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एस. पी. बुराडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विणा लिल्हारे यांनी आभार मानले.