लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : या परिसरातील ग्रामपंचायत कार्यालय डुंडा येथील रोजगार सेवकाने गावातील मंजूर कामे करू दिली नाही. त्यामुळे भर उन्हाळ्यामध्ये मजुरांना काम मिळाले नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून रोजगार सेवकावर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.डुंडा ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून सन २०१५-२०१६ मध्ये नऊ कामे मंजूर झाली असून पाच शेतकऱ्यांच्या शेतविकासाची कामे अर्धवट करण्यात आली. तर उर्वरित चार कामे न सुरूच न केल्याने गावातील मजुरांना काम मिळाले नाहीे. रोजगार सेवकाने पंचायत समितीला रेकार्ड पाठविला नाही. त्यामुळे वेळेत कामे सुरू झाली नाही. तर जॉबकार्ड अद्ययावत नाही, जॉबकार्डची नोंद नाही, रोजगार दिवस पाळला जात नाही, गावातील मजुरांचा नमुना पाच भरलेला नसून त्याची माहिती मजुरांना दिली नाही. रोजगार सेवकाकडे १ ते ७ नमुना उपलब्ध आहे परंतु भरलेला नाही. रोजगार सेवकाकडे काम मागणी अर्ज उपलब्ध नाही. सिमेंट रोड फलकावर लांबी लिहिलेली नाही व ए.बी. उपलब्ध नाही. या गावातील काही मजुरांकडे जॉबकार्ड नसून ते रोजगार हमी योजनेच्या कामावर जात असतात. तर काही लोकांना कामावर जावून सुद्धा अजूनपर्यंत मोबदला मिळालेला नाही. कृती आराखडा तयार नाही. आदी विविध समस्या आहेत. मंगळवारी (दि.५) ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या सभेमध्ये रोजगार सेवक मुनेश्वर मेश्राम हजर झाले नाही. त्यामुळे त्यांची तक्रार पंचायत समितीकडे करण्यात आली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी आहे.सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेंतर्गत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु रोजगार सेवक हजर नव्हते. तसेच कसल्याही प्रकारचा अर्ज सुद्धा रोजगार सेवकांनी दिलेला नव्हता. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढील चौकशी करावी.-शरद चिमनकरसचिव, ग्रामपंचायत कार्यालय, डुंडा
रोजगार सेवकाचा अनागोंदी कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 1:03 AM
या परिसरातील ग्रामपंचायत कार्यालय डुंडा येथील रोजगार सेवकाने गावातील मंजूर कामे करू दिली नाही. त्यामुळे भर उन्हाळ्यामध्ये मजुरांना काम मिळाले नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून रोजगार सेवकावर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
ठळक मुद्देमंजूर कामेच केली नाही : कारवाईची गावकऱ्यांची मागणी