लोकशाही मजबुतीसाठी प्रत्येक घटक महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 10:02 PM2018-12-04T22:02:37+5:302018-12-04T22:02:58+5:30

लोकशाही प्रणालीमध्ये सर्वांना मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे लोकशाही मजबूत करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.

Every element is important for democracy | लोकशाही मजबुतीसाठी प्रत्येक घटक महत्त्वाचा

लोकशाही मजबुतीसाठी प्रत्येक घटक महत्त्वाचा

googlenewsNext
ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : जागतिक दिव्यांग दिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : लोकशाही प्रणालीमध्ये सर्वांना मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे लोकशाही मजबूत करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सोमवारी (दि.३) जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोडीत दिव्यांग दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिल्ह परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शुभांगी आंधळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. बलकवडे यांनी, दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम शासन करीत आहे. दिव्यांग बांधव सुद्धा समाजाचा एक घटक आहे. त्यामुळे लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांनी मतदान करणे गरजेचे आहे असे सांगितले.
डॉ.दयानिधी यांनी, दिव्यांग घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रीयेमध्ये सामावून घेण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे मत व्यक्त केले.
रामटेके यांनी, दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, बिज भांडवल योजना, आंतरजातीय विवाह योजना व मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना असून दिव्यांग बांधवांनी त्यांचा लाभ घ्यावा असे सांगितले.
प्रास्ताविकातून आंधळे यांनी, येत्या लोकसभा निवडणुकीत दिव्यांग घटकांना सामावून घेण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने ‘सुलभ निवडणुका’ हे घोषवाक्य जाहिर केले आहे. त्यानुसार दिव्यांग घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रि येमध्ये सामावून घेण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.
दिव्यांग मतदारांमध्ये लोकशाही प्रक्रियेबाबत अधिक जनजागृती व्हावी आणि त्यांचा सहभाग वाढावा यासाठी दिव्यांग मतदारांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहे किंवा १ जानेवारी २०१९ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणार आहेत त्यांनी अर्ज क्रमांक ६ अवश्य भरु न द्यावयाचा असून बीएलओंकडे उपलब्ध आहे. तसेच तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा उपलब्ध करु न दिला जाईल असे त्यांनी सांगितले.
संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले. आभार हरिश्चंद्र मडावी यांनी मानले.
कार्यक्र माला दिव्यांग बंधू-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
दिव्यांग मतदारांचा केला सत्कार
कार्यक्रमात हारेश गुप्ता, शेहबाग शेख, आकाश मेश्राम, राखी चुटे, देवेंद्र रहमतकर, इंदू बघेले, दुर्गेश जावळकर, कमलेश फुंडे, राजकुमार बावीरशेट्टी, हिर्शका उके व विजय वटचानी इत्यादी दिव्यांग मतदारांचा मान्यवरांच्या हस्ते ‘मतदार असल्याचा अभिमान-मतदानासाठी सज्ज’ हे घोषवाक्य लिहिलेले बॅच व गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्यासोबत मतदान प्रकीयेविषयी संवाद साधण्यात आला. पश्चात, मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात दिव्यांग बांधवांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

Web Title: Every element is important for democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.