प्रत्येकाने निष्ठेने काम करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:18 AM2021-02-19T04:18:06+5:302021-02-19T04:18:06+5:30
गोरेगाव : शिक्षक समितीचे जिल्ह्यात रोपट्याचे वटवृक्ष झाले आहे. शिक्षकांच्या एकीचे हे फलित असून, हीच संघटनशक्ती आहे. यासाठीच प्रत्येकाने ...
गोरेगाव : शिक्षक समितीचे जिल्ह्यात रोपट्याचे वटवृक्ष झाले आहे. शिक्षकांच्या एकीचे हे फलित असून, हीच संघटनशक्ती आहे. यासाठीच प्रत्येकाने निष्ठेने काम करावे व समितीला प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष शेषराव येळेकर यांनी केले.
येथील गुरुकृपा लॉनमध्ये जिल्हा कार्यकारिणी विस्तार व गोरेगाव तालुका कार्यकारिणीचे गठन करण्यासाठी आयोजित सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार, कार्याध्यक्ष काका चौधरी, उपाध्यक्ष जी.ई.येडे, जिल्हा सरचिटणीस संदीप मेश्राम, संदीप तिडके, एन बी. बिसेन, प्रदीप रंगारी, माधव टेंभरे, वाय. पी. लांजेवार, कैलास हांडगे, उमेश रहांगडाले, अनूप नागपुरे, बी.एस.केसाळ, एम.पी.म्याकलवार, राधेश्याम ठाकरे, विश्वराज मेंढे, मुकेश रहांगडाले, वाय.वाय.रहांगडाले, गजानन पाटणकर, विनोद बहेकार, डी.व्ही.बहेकार, सतीश दमाहे, वीरेंद्र वालोदे, कृष्णा कहालकर, दिलीप लोदी, एस.पी.शंभरकर, ज्योती डाबरे, कौशल्या वंजारी, कविता चक्रवर्ती, ललिता थुलकर, कामेश्वरी पारधी, नाकाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी कार्याध्यक्ष चौधरी यांनी, संघटनेत काम करताना शिस्त, निष्ठा, संयम आणि लढाऊ प्रवृत्ती या कार्यकर्त्यांत असायलाच हव्या. कुणीही आलेल्या संकटांना घाबरून न जाता लढत राहायला हवे, असे मत व्यक्त केले. शंभरकर यांनी, संघटनेच्या कार्यात पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी संघटनेत पुढाकार घेऊन कार्य केले पाहिजे, असे मत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष डोंगरवार यांनी, कार्यकर्ता कसा घडतो आणि नेतृत्व कसे निर्माण होते, याबद्दल मार्गदर्शन केले, तसेच समितीने मागील काळात कशा पद्धतीने आपल्या निरंतर कार्यातून शिक्षक समस्या निकाली काढल्या, याबद्दल माहिती दिली. सर्वांना सोबत घेऊन समितीचा विस्तार जिल्हाभर करून कुणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, याची ग्वाही दिली. तर प्रास्ताविकातून तिडके यांनी, शिक्षक समितीने शिक्षकांच्या समस्या सोडवून न्याय मिळवून देण्यासाठी अविरत केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली. शिक्षकांनी आपल्या पुढे येणाऱ्या समस्या आणि त्यासाठी द्यावा लागणारा लढा यासाठी संघटनांचे महत्त्व विशद केले. संचालन चाचेरे यांनी केले. आभार जिल्हा मुख्य संघटक उमेश रहांगडाले यांनी मानले. सभेला पी.एस. ठाकरे, पी. जी. कटरे, सुरेश बिसेन, एस.सी.टेकाम, एल. सी. पार्टी, पांडुरंग देशमुख, एन. डी. राठोड, युवराज बोपचे, नूतन डोंगरे, सुनील टेंभुर्णीकर, गणेश लोहाडे, डी. व्ही.बहेकार, डी.के.कुरटकर, डी.एस.होटे, शरद उपलपवार, ए.झेड.बोदेले, यू.आर.गजभिये, आर.एस.शहारे, राजू गाढवे, आर.एच.ठाकरे, प्रदीप रंगारी, आर.आर.शिदने, एन.जी.कांबळे, अंजन कावळे, ई.एफ.देशमुख, टी.के.बोपचे, वाय.एम.भगत, व्ही.टी.बहेकार, एस.जी.राऊत, एच.एच.सोनवाने, एन.के.अमृतकर, आर.एच.वाघाडे, आर.डी.गणवीर, वाय.एच.बुध्दे, जी.एन.डोंगरे, एन.बी.डोंगरे, ए.यू.बांबोडे, एस.आर.साबळे, एम.डी.ठाकूर, ओ.एच.लिल्हारे, एस.डी.रहांगडाले, डी.बी.बरय्या, एस.बी.हुकरे, एच.ए.मडावी, बी.बी.मेंढे, ए.आर.नागपुरे, एच.डी.टेंभुर्णे, बी.के.कटरे, एम.आर.रहांगडाले, आर.जे.रहांगडाले, एस.आर. शहारे, एन.डी.सुरजजोशी, डी.बी.तांडेकर, डी.के.रामटेके, ओ.एल.कवरे, डी. एम. बिसेन, व्ही.आर.रहांगडाले, आर.एल.पारधी, के.एन.लंजे, के.एस.पर्वते, दिलीप लोदी, एस.एम.हरीणखेडे, एम.पी.पर्वते, ए.एन.कापगते, एन.सी.वैद्य, जे.आर.रंगारी, एच.पी.कटरे, एल.एम.नाकाडे, एल.सी.पारधी, पी.जे.बडोले, एस.आर.मळकाम, व्ही.बी.मरस्कोल्हे, पी.एस.उके, आर.जी.नागपुरे व बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.
-------------------------------
‘सन्मान सावित्रीच्या लेकींचा’ ७ मार्च रोजी
सभेत समितीतील महिला भगिनींच्या सन्मानार्थ समितीच्यावतीने ७ मार्च रोजी ‘सन्मान सावित्रीच्या लेकींचा’ हा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
------------------------
अशी आहे जिल्हा व तालुका कार्यकारिणी
जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा मार्गदर्शकपदी शेषराव येडेकर, उपाध्यक्ष जी.ई.येडे, जिल्हा मुख्य संघटक उमेश रहांगडाले, उपाध्यक्ष युवराज बोपचे, जिल्हा सहसचिव एस.एम.हरिणखेडे, चिटणीस व्ही.आर.रहांगडाले, कार्यालयीन चिटणीस चाचेरे, महिला प्रतिनिधी वंदना झोडे यांचा समावेश आहे. तर गोरेगाव तालुका कार्यकारिणीत अध्यक्षपदी डी. डी. बिसेन यांची अविरोध निवड करण्यात आली असून, सरचिटणीसपदी नरेंद्र जोशी, कार्याध्यक्ष सी.बी.पटले, कोषाध्यक्ष पी.जी.साकुरे, प्रसिद्धी प्रमुख वीजेंद्र केवट, मुख्य संघटक सुंदरसिंग साबळे, संघटक विजय मरस्कोल्हे, महिला प्रतिनिधी पी.आर.मुरकुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.