प्रत्येकाने देशसेवेसाठी कार्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 10:29 PM2018-09-30T22:29:15+5:302018-09-30T22:30:14+5:30

देशासाठी आपली स्वत:ची काय जबाबदारी आहे हे आपण ओळखले पाहिजे. देशसेवेसाठी ज्या सैनिकांनी बलिदान दिले ते वाया जाणार नाही. भारतीय सैन्य दल कुठेही मागे नाही.

Everyone should work for a nation service | प्रत्येकाने देशसेवेसाठी कार्य करावे

प्रत्येकाने देशसेवेसाठी कार्य करावे

Next
ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : जिल्हाधिकारी कार्यालयात शौर्य दिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देशासाठी आपली स्वत:ची काय जबाबदारी आहे हे आपण ओळखले पाहिजे. देशसेवेसाठी ज्या सैनिकांनी बलिदान दिले ते वाया जाणार नाही. भारतीय सैन्य दल कुठेही मागे नाही. आपले सैनिक सीमेवर देशाची सुरक्षा करतात, त्यामुळेच आपण सुरक्षीत आहोत. त्यामुळे प्रत्येकाने देशसेवेसाठी कुशल कार्य करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह शनिवारी (दि.२९) आयोजित शौर्य दिन कार्यक्र मात त्या अध्यक्षस्थानावरु न बोलत होत्या. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी ए.के.सवई, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुनील कोरडे, निवासी उपजिल्हाधिकारी हरीश धार्मिक, पोलीस उपअधीक्षक (गृह) सोनाली कदम प्रामुख्याने उपस्थित होत्या. पुढे बोलताना डॉ.बलकवडे यांनी, २९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान हद्दीत शिरून सर्जीकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगीरी राज्यातील जनतेपर्यंत व्यापक प्रमाणात पोहोचिवण्यासाठी व माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २९ सप्टेंबर हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो असे त्यांनी सांगितले.
सवई यांनी, आपले सैनिक हे कोणत्याही अडचणींची पर्वा न करता आपली कर्तव्ये चोखपणे बजावतात. सैनिकांच्या वर्दीमध्ये ताकद असते. सैनिक कधीही देशसेवेसाठी तत्पर असतात. सैनिकांमध्ये शिस्त असते असे त्यांनी सांगितले. धार्मिक यांनी, परकीय शक्तींपासून देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी आपला सैनिक सदैव तत्पर असतो.
त्यामुळेच आपण सर्वजन सुरक्षीत आहोत. देशासाठी आपण कुशल कार्य केले पाहिजे. प्रत्येक नागरिकांनी स्वच्छता ठेवायला हवी. कधी कोणी कुठेही थुंकू नये. योग्य शिस्त ठेवून आपण देशासाठी आपले योगदान दिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांच्या हस्ते वीरपत्नी राजश्री क्षीरसागर यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्र मास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, लेखाधिकारी एल.एच.बाविस्कर, सहायक अधीक्षक आर.एच.पटले, मनोहरभाई पटेल सैनिकी शाळेचे कैलाश जांगळे यांच्यासह फुलचूर हायस्कूल विद्यार्थी, मनोहरभाई पटेल सैनिकी शाळेचे विद्यार्थी, माजी सैनिकांच्या विधवा व माजी सैनिक बहुसंख्येने उपस्थित होते. संचालन करु न प्रास्ताविक कल्याण संघटक धनराज बावनथडे यांनी मांडले. आभार कल्याण संघटक जगदिश रंगारी यांनी मानले.

Web Title: Everyone should work for a nation service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.