परवाना नसलेल्या जागेत गौण खनिजाचे उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 11:38 PM2018-09-27T23:38:04+5:302018-09-27T23:39:13+5:30
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून शेतांमध्ये पिके आहेत. त्यामुळे या कालावधी गौण खनिजाचे उत्खनन करण्याची परवानगी दिली जात नाही. मात्र एका कंत्राटदाराने महसूल विभागाच्या डोळ्यात धुळफेक करीत परवानगी नसलेल्या जागेतून अवैध उत्खनन केल्याचा धक्कादायक प्रकार हलबीटोला येथे उघडकीस आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून शेतांमध्ये पिके आहेत. त्यामुळे या कालावधी गौण खनिजाचे उत्खनन करण्याची परवानगी दिली जात नाही. मात्र एका कंत्राटदाराने महसूल विभागाच्या डोळ्यात धुळफेक करीत परवानगी नसलेल्या जागेतून अवैध उत्खनन केल्याचा धक्कादायक प्रकार हलबीटोला येथे उघडकीस आला आहे.
प्राप्त माहितीनुसार गोरेगाव येथील तहसीलदारांनी गोरेगाव मंडळातील साझा क्र मांक ०८ मध्ये येणाऱ्या हलबीटोला येथील शेतकरी सुकचंद पटले यांच्या गट क्र मांक ९/३ आराजी ०.७१ हेक्टर आर पैकी ०.२० हेक्टर आर जागेतून पटले यांना २५ ब्रास मुरु म उत्खननांची परवानगी दिली. मात्र या शेत जमिनीत भात पिक लावले असल्याने परवानाधारकाने अगडे यांच्या शेतजमिनीतून २४ सप्टेबरपासून जेसीबी लावून अवैध उत्खनन सुरु केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
हलबीटोला येथील शेतकरी सुकचंद पटले यांनी १५ सप्टेबरला ५० ब्रास मुरु म उत्खनन व वाहतूक करण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज सादर केला होता. त्या अर्जानुसार सांझा क्र मांक ०८ मध्ये येणाºया शेतजमीन गट क्र मांक ९/३ आराजी ०.७१ हे आर पैकी ०.२० हेक्टर आर शेत जमिनीतून २५ ब्रास मुरूम उत्खनन करण्याची परवानगी २४ ते ३० सप्टेबरपर्यंत दिली. मात्र या गट क्रमाकांत तहसीलदाराने परवानाधारकास मुरूम उत्खननाची परवानगी कशी दिली अशी गावकºयांमध्ये चर्चा आहे. सध्या सुकचंद पटले यांच्या शेतजमिनीत धानपिक असल्याने या ठिकाणी मुरु म उत्खननाची कामे सुरु केले नाही.
मात्र गोरेगाव नगरपंचायतीच्या घनकचरा केंद्राच्या जवळ ७०० फूट अंतरावर असलेल्या अगडे यांच्या शेतजमिनीतून जेसीबीने २४ सप्टेबरपासून अवैध मुरु म उत्खनन सुरु आहे. गौणखनिज उत्खनन करण्याची परवाणगी तहसीलदार यांनी दिल्यानंतर तलाठ्याने गौणखनिज उत्खनन जागेचे मोजमाप परवानाधारकास करु न द्यावे लागते.
मात्र तलाठ्याने याकडे दुर्लक्ष केल्याने परवानाधारकाने विना परवाना शेतजमिनीतून अवैध मुरु म उत्खनन सुरु केले आहे. हे उत्खनन जेसीबीने करता येत नाही. परंतु सर्रास जेसीबीने लावून उत्खनन केले जात आहे. जेसीबीने १० फूट खोल खड्डा केल्याने तीन दिवसात २०० ब्रास मुरु म वाहतूक करु न हिराडामाली एमआयडीसी जवळील घनकचरा केंद्राजवळ जमा केल्याची माहिती आहे.
याबाबत तलाठी गौरीशंकर गाढवे यांच्याशी संर्पक साधला असता नियमानुसार उत्खनन झाले नसल्यास पंचनामा करुन दंडात्मक कारवाही केली जाईल असे लोकमतशी बोलताना सांगितले. तर तहसीलदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला. त्यामुळे या सर्व प्रकराची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.