वाघांच्या संवर्धनासाठी वन समितीची क्षेत्रभेट

By admin | Published: September 14, 2014 12:00 AM2014-09-14T00:00:42+5:302014-09-14T00:00:42+5:30

नागझिरा-नवेगाव वाघ परियोजनेअंतर्गत असलेल्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे गडचिरोली भ्रमण करविण्यात आले. जिल्ह्यातील समित्यांनी मेंढा या गावातील वन समितीचे मार्गदर्शन घेऊन

Field Committee of Forest Committee for the conservation of tigers | वाघांच्या संवर्धनासाठी वन समितीची क्षेत्रभेट

वाघांच्या संवर्धनासाठी वन समितीची क्षेत्रभेट

Next

गोंदिया : नागझिरा-नवेगाव वाघ परियोजनेअंतर्गत असलेल्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे गडचिरोली भ्रमण करविण्यात आले. जिल्ह्यातील समित्यांनी मेंढा या गावातील वन समितीचे मार्गदर्शन घेऊन गोंदिया जिल्ह्यातील वनांचे सरंक्षण कसे करता येईल याची माहिती प्राप्त केली.
गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील मेंढा गावातील वनसमिती आपल्या परिसरातील १८०० हेक्टर वनजमिनीचे संरक्षण करते. या समितीने वनजमिनीत लावलेले बांबु व इतर झाडांचे संवर्धन केले. या समितीचे प्रत्येक सदस्य आळीपाळीने वनजमिनीचे संरक्षण करतात. त्यांची वन संरक्षणाची पध्दत कशी आहे. हे पाहण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील वन समित्या मेंढा येथील दौऱ्यावर गेल्या होत्या.
भारतीय वन्यजीव न्यासतर्फे हा दौरा आयोजित करण्यात आला होता. वाघाच्या संवर्धनासाठी जंगल कसे वाचविता येईल यावर अभ्यास करण्यात आला.
मेंढा येथील सदस्य नंदा दुग्गा यांनी केलेल्या कामाची माहिती देण्यात आली. आधुनिक चुल शाश्वत पध्दतीने तयार करून वन उपजत संग्रह व त्याच्या मूल्यवर्धनासाठी मुरदोलीचे सरपंच शैलेंद्र भगत यांनी नंदा दुग्गा यांची मोहफुलाचे लोणच शाश्वत पध्दतीने कसे तयार केले याची माहिती देणारी पुस्तक यांनी भेट दिली.
संयुक्त वन समिती सोदलागोंदीचे अध्यक्ष बाबुलाल फरदे, यादोराव भुरे, नोकलाल डोलारे, जांभूळपाणीचे जयपाल गदवार, गराडाचे सुरेंद्र भोंडे, नवाटोलाचे सुरेंद्र येले, केशोराव भलावी, आलेबेदरचे आत्माराम मरस्कोल्हे, पुरणलाल उईके, खामतलाव येथील हेतराम इळपाते, मिलाराम इळपाते, सहाकेपार येथील संतोष उईके, प्रकाश कुंभडे, मुंडीपार येथील प्रविण कटरे, जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचेंद्र भगत, उषा पिसदे, अलका काटेवार, महेंद्र पिसदे, भारतीय वन्यजीव न्यासचे अनिलकुमार, समिम अहमद व हिवराज राऊत उपस्थित होते.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Field Committee of Forest Committee for the conservation of tigers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.