प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाच कर्मचारी कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:26 AM2021-04-19T04:26:01+5:302021-04-19T04:26:01+5:30
केशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ३४ गावांचा समावेश आहे. या गावात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या ...
केशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ३४ गावांचा समावेश आहे. या गावात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने कोरोनाबाधित रुग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी अपुऱ्या मनुष्यबळाअभावी आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहेत.
वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थांनी घरच्या घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे भावनिक आवाहन केले आहे. गेल्या २०-२५ वर्षांपासून केशोरी या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. पिंकू मंडल कार्यरत आहेत. यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्रात समाविष्ट असलेल्या प्रत्येक गावातील रुग्णांच्या पाठीमागे पूर्णक्षमतेने खंबीरपणे उभे राहून रक्ताच्या नात्यापेक्षाही रुग्णासोबत नाते निर्माण करून आरोग्य सेवा सक्षमपणे अर्जित केली आहे. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यातही पाच आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित झाली आहेत. अशात रुग्णांना सेवा अर्जित करण्यात मनुष्यबळाअभावी आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्यामुळे डॉ. पिंकू मंडल यांनी ग्रामस्थांना कोणीही घराबाहेर पडू नये आपली व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेऊन तालुका प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घोषित केलेल्या संचारबंदीस घरच्या घरीच राहून सहकार्य करावे, असे कळविले आहे.