सहकारमंत्र्यांच्या आश्वासनंतर संचालकांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 12:16 AM2018-08-05T00:16:31+5:302018-08-05T00:17:15+5:30

सडक अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समिती व गोदामासाठी जागा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीला घेवून बाजार समितीच्या सभापती, उपसभापती व संचालकांनी २ आॅगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.

Following the assurances of the co-minister, | सहकारमंत्र्यांच्या आश्वासनंतर संचालकांचे उपोषण मागे

सहकारमंत्र्यांच्या आश्वासनंतर संचालकांचे उपोषण मागे

Next
ठळक मुद्देबाजार समिती जागा प्रकरण : १५ आॅगस्टपर्यंत पाठविणार अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सडक अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समिती व गोदामासाठी जागा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीला घेवून बाजार समितीच्या सभापती, उपसभापती व संचालकांनी २ आॅगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. अखेर या उपोषणाची दखल घेत सहकार मंत्री सुभाष देखमुख यांनी बाजार समिती व गोदामासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी शुक्रवारी (दि.३) उपोषण सोडले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व संचालकांनी २ आॅगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. याची दखल खा. प्रफुल्ल पटेल, मधुकर कुकडे यांनी घेतली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संर्पक साधून जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्यानंतर राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी(दि.३) जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याशी संपर्क साधून उपोषणकर्त्यांशी चर्चा करुन प्रकरण मार्गी लावण्याचे निर्देश दिले. तसेच महिनाभराच्या आत कृषी उत्पन्न बाजार समिती व गोदामासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन सभापती डॉ.अविनाश काशीवार यांना दूरध्वनीवर दिले. त्यांनतर जिल्हाधिकारी बलकवडे यांनी उपोषण मंडपाला भेट देवून कृषी उत्पन्न बाजार समितीची जागेची समस्या निश्चितपणे मार्गी लागेल अशी ग्वाही दिली. त्यानंतर निंबू पाणी देवूून उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडले. यासाठी माजी आ.दिलीप बन्सोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापूरे, रमेश चुऱ्हे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हा अधिकारी हरिश धार्मिक उपजिल्हाधिकारी शुुभांगी अंधारे, तहसीलदार विजय बुरुडे उपस्थित होते.

Web Title: Following the assurances of the co-minister,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.