आर्थिकदृष्टया कमजोर विद्यार्थ्यांसाठी शिक्षा निधीचे गठन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 09:52 PM2019-06-27T21:52:20+5:302019-06-27T21:52:34+5:30
राष्ट्रीय क्षत्रिय पवार महासभेच्या २३ जून रोजी पार पडलेल्या कार्यकारिणी बैठकीत समाजातील गुणवंत मात्र आर्थिकदृष्टया कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण उपलब्ध व्हावे. या उद्देशाने पहिल्यांदाच शिक्षा निधी निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. समाजाचे कार्य तळागळापर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हास्तरावर संघटन तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राष्ट्रीय क्षत्रिय पवार महासभेच्या २३ जून रोजी पार पडलेल्या कार्यकारिणी बैठकीत समाजातील गुणवंत मात्र आर्थिकदृष्टया कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण उपलब्ध व्हावे. या उद्देशाने पहिल्यांदाच शिक्षा निधी निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. समाजाचे कार्य तळागळापर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हास्तरावर संघटन तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मुरलीधर टेंभरे होते. या वेळी संरक्षक माजी अध्यक्ष टी.डी.बिसेन, डॉ.एन.डी.राऊत, महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेश देशमुख, राजेंद्रप्रसाद पटले, मोतीलाल चौधरी, अॅड. किरणलता चोपडे, अशोक बिसेन राष्ट्रीय संघटन सचिव खेमेंद्र कटरे, कोषाध्यक्ष रमेश टेंभरे, सहकोषाध्यक्ष दिलीप रहागंडाले, जनसंवाद सचिव सुनील गौतम, सुखदेव पारधी, युवा अध्यक्ष प्रल्हाद पटले, सहसचिव सुरेश देशमुख, मनोज भैरम, जितेंद्र बिसेन यांच्यासह सदस्य अर्पण बिसेन (इंदोर),जगदीशचंद्र पवार (बैतुल), अॅड. रु पेंद्र कटरे, जगदीश येडे, नेपालसिंह तुरकर, विद्या बिसेन, देवेंद्र चौधरी, मनमोहन रहागंडाले, लिखेंद्र बिसेन यांच्यासह भंडारा, नागपूर, हिगंणा, भिलाई, रायपूर, बालाघाट, तुमसर, रामटेक, छिंदवाडा येथील पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीची सुरवात चक्र वर्ती राजाभोज व गडकालिका माता यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. बैठकीत महासभेच्या ११३ वर्षाच्या सामाजिक कार्याची माहिती देण्यात आली.
यावर्षीची पहिली आमसभा (अधिवेशन) मध्यप्रदेशातील बैहर येथे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शैक्षणिक अभ्यासक्रमात सम्राट विक्रमादित्य व राजाभोज यांचे जीवनचरित्र समाविष्ट करणे आणि डाकतिकीट काढण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पवार समाजातील अन्य शाखांसोबत समन्वय स्थापन करणे तसेच राजपूर पवार शाखेसोबत समन्वय स्थापन करण्यावर चर्चा करण्यात आली.
पवार, पोवार समाज हा ओबीसी प्रवर्गात येत असल्याने या प्रवर्गातील सर्व योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी ओबीसी योजनांची माहिती देण्यात आली.