संपकाळातील तीन दिवसाचे वेतन मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 01:09 AM2018-10-20T01:09:46+5:302018-10-20T01:10:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचे तीन दिवसाचे वेतन जि.प.चे मुख्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचे तीन दिवसाचे वेतन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी कपात केले होते. परंतु यासंदर्भात तिरोडा गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आ. विजय रहांगडाले यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली. त्यावर संप काळातील तीन दिवसाचे वेतन देण्यात यावे असे आदेश शिक्षण मंत्र्यांनी मुकाअ यांना दिले.
७ आॅगस्ट २०१८ ते ९ आॅगस्ट २०१८ पर्यंत तीन दिवसीय संपूर्ण राज्य कर्मचाºयांनी प्रलंबित मागण्यांबाबत राज्यस्तरीय संप पुकारला होता. या संपामधील कर्मचाºयांच्या विविध मागण्यावर शासनातर्फे सकारात्मक भूमिका दर्शविल्यामुळे जिल्हा परिषद कर्मचाºयांनी ९ आॅगस्टला दुपारी १२ वाजता आपला संप मागे घेत १२ नंतर आपल्या कार्यस्थळी रुजू झाले होते.
या संपाबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडून ६ आॅगस्ट २०१८ ला शासन परिपत्रकाद्वारे संपामध्ये सहभागी कर्मचाºयांना संप न होण्याकरिता उपाययोजना करण्याबाबत सूचित केल्याचे निदर्शनास आले आहे.
शासन परिपत्रकाच्या आधारावर मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.गोंदिया यांनी संप कालावधीमध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचे तीन दिवसाचे वेतन कपात करण्याबाबत सर्व विभागाला पत्र दिले. संप काळातील कर्मचाऱ्यांचे तीन दिवसाचे वेतन कपातीबाबतचे मुकाअ यांचे आदेश रद्द करण्यात यावे व संपात सहभागी जि.प. कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा, ही मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विरेन्द्रकुमार कटरे, सरचिटणीस अनिरूध्द मेश्राम, नूतन बांगरे, उमाशंकर पारधी, सुधिर बाजपेयी, केदार गोटेफोडे, हेमंत पटले, नागसेन भालेराव, यशोधरा सोनवाने, वाय. डी. पटले, मोरेश बडवाईक, नरेन्द्र आगाशे, सुशिल रहांगडाले, अमोल खंडाईत, विजय डोये, दिनेश बोरकर, आर.एस.संग्रामे, दुर्गाप्रसाद कोकोडे, विनोद चौधरी, डी.बी.लांजेवार, सुरेश रहांगडाले, मयूर राठौर, जी.जी.खराबे, तोषिलाल लिल्हारे, शंकर नागपूरे, योगेश्वर मुंगुलमारे, शंकर चव्हाण, पवन कोहळे, श्रीधर पंचभाई, पी.के. पटले, एन.जे. डहाके यांनी सतत लावून धरली होती.
या मागणीवर आ. विजय रहांगडाले यांनी पुढाकार घेऊन मंजूर करवून घेतली. या संदर्भात मुकाअ व शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्या सोबत चर्चा करण्यात आली.