भाजपची आंदोलनाची नौटंकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:36 AM2021-09-16T04:36:42+5:302021-09-16T04:36:42+5:30
अर्जुनी मोरगाव : ओबीसींना आरक्षण दिल्याशिवाय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका घेऊ नये यासाठी भाजपचे राज्यात आंदोलन सुरू आहेत. ...
अर्जुनी मोरगाव : ओबीसींना आरक्षण दिल्याशिवाय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका घेऊ नये यासाठी भाजपचे राज्यात आंदोलन सुरू आहेत. केंद्र सरकारकडेच ओबीसीची माहिती आहे. मग आंदोलनाची गरज काय? भाजपची ही नौटंकी न समजण्याएवढी जनता दूधखुळी नाही, असे मत माजी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी व्यक्त केले.
भाजपचे आंदोलन नेमके कशासाठी आहे तेच कळत नाही. आर्थिक जनगणनेचा संपूर्ण डाटा केंद्र सरकारकडे आहे. ते न देण्याचे नेमके कारण काय? सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण बाद केले. विना ओबीसी आरक्षणाशिवाय जि.प. व पं.स. पोटनिवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी सर्वच पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. यासाठी जबाबदार असतानाही केवळ पाप लपवण्यासाठी भाजपने चक्क राज्य सरकार विरोधात बुधवारी आंदोलने केली. आंदोलनांमुळे ओबीसी खुश होईल व आगामी निवडणुकांत पाठीशी राहील, लोकप्रियता प्राप्त होईल हा भाजपचा केवळ भ्रम आहे. जनता हे न समजण्याएवढी दूधखुळी नाही, असा आरोप परशुरामकर यांनी केला.