धानाला २५०० रुपये प्रती क्विंटल भाव द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 06:00 AM2019-12-19T06:00:00+5:302019-12-19T06:00:14+5:30
गोंदिया, भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या भागातील धान हेच मुख्य पीक असून यावरच या भागातील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. मात्र मागील दोन तीन वर्षांपासून धान उत्पादक शेतकरी सातत्याने दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून त्यांना आधार देण्याची गरज आहे. केंद्र शासनाने धानाला यंदा १८३५ रुपये प्रती क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : धानाच्या लागवड खर्चात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने धानाची शेती तोट्याची होत चालली आहे. त्यातच केंद्र सरकारने धानाला जाहीर केलेला हमीभाव हा फार कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे खा.प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्त्वात गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच विविध मागण्यांचे निवेदन या वेळी पवार यांना देण्यात आले.
गोंदिया, भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या भागातील धान हेच मुख्य पीक असून यावरच या भागातील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. मात्र मागील दोन तीन वर्षांपासून धान उत्पादक शेतकरी सातत्याने दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून त्यांना आधार देण्याची गरज आहे. केंद्र शासनाने धानाला यंदा १८३५ रुपये प्रती क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. तर राज्य सरकारने नुकताच प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस जाहीर केला आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या बोनसमध्ये १८५ रूपयांची वाढ करुन धानाला एकत्रीत २५०० रुपये प्रती क्विंटल हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना खा.प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनातून केली. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योगांची स्थापना करुन शेतकºयांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्याची मागणी केली. या वेळी खा.सुनील तटकरे उपस्थित होते. शिष्टमंडळात माजी मंत्री नाना पंचबुध्दे, माजी आ. राजेंद्र जैन, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, प्रदेश सचिव धनंजय दलाल, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, भंडारा जि.प.चे उपाध्यक्ष विवेकानंद कुर्झेकर, यशवंत सोनकुसरे, किशोर तरोणे, डॉ. अविनाश काशीवार, लोमेश वैद्य, देवचंद ठाकरे, शैलेश मयूर, सुनंदा मुंडले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.