लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : संपूर्ण कर्जमुक्ती या प्रमुख मागणीसह आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी विविध राजकीय पक्षांसोबत राज्यभरात ५ जूनला महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. याचे पडसाद गोंदिया जिल्ह्यातही पडल्याचे दिसून आले. मोर्चे व बाईक रॅली काढून तहसीलदारांना निवेदनेही देण्यात आलीत.गोंदिया : किसान संघटनेद्वारे आज घोषित महाराष्ट्र बंदच्या समर्थनात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यात शेतकऱ्यांना कर्जमाफी, धानाला तीन हजार रुपये भाव, बोनस, शेतकऱ्यांच्या उत्पादनास लागती नुसार योग्य मुल्य मिळावे व जनसामान्यांच्या विविध मागण्यांचा समावेश होता. याप्रसंगी विनोद हरिणखेडे, छोटू पटले, अशोक शहारे, जितेश टेंभरे, शिव शर्मा, तिर्थराज हरिणखेडे, मनोज डोंगरे, सुनीता मडावी, रमेश गौतम, शैलेष वासनिक, प्रिती रामटेके, पुरनलाल उके, रामकृष्ण गौतम, नाजूक शेंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.गोरेगाव : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देवून शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी करण्यात आली. यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी केवल बघेले यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. तिरोडा : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांसह विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य राजलक्ष्मी तुरकर, डॉ. अविनाश जायस्वाल, प्रेम रहांगडाले, पंचम बिसेन, पारधी आदी पदाधिकारी उपस्थित होते. आमगाव : तालुका शेतकरी पंचायत व ओबीसी संघर्ष कृती समितीतर्फे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देवून शेतकऱ्यांच्या तीव्र भावना व पडसादसूचक इशारा देण्यात आला. राज्यातील शेतकरी संघटनांनी १ जूनपासून ‘शेतकरी संपावर’ आंदोलन पुकारला असून ५ जूनला महाराष्ट्र बंदचे आंदोलन केले. आजपर्यंतच्या सर्वच शासनाने शेतकऱ्यांना मोठमोठ्या उपाधी दिल्यात. परंतु कृषी मात्र शेतकऱ्यांना उपाशी ठेवून आत्महत्येच्या उंबरठ्यावर नेण्याच्या केल्या. त्यामुळे आता अन्याय पुढे सहन करणार नाही, असा इशारा आमगाव तालुका शेतकरी पंचायतद्वारे ओबीसी संघर्ष कृती समितीतर्फे देण्यात आला. मागण्या तत्काळ मंजूर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा यापुढे हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, तालुकाध्यक्ष कमलबापू बहेकार, जि.प.सदस्य सुखराम फुंडे, सुरेश हर्षे, जियालाल पंधरे, राजेश भक्तवर्ती, टिकाराम मेंढे, विनोद कन्नमवार, तुलेंद्र कटरे, तिरथ येटरे, कविता रहांगडाले, रवि क्षीरसागर, सुनील ब्राम्हणकर, अजय बिसेन, बाबुलाल दोनोडे, देवेंद्र मच्छिरके, नरेंद्र शिवणकर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.अर्जुनी मोरगाव : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण करण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी मनोहर चंद्रिकापुरे यांच्यासह तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी शेतकऱ्यांसह उपस्थित होते.देवरी : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांसह विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सडक अर्जुनी : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांसह विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सालेकसा : सालेकसा तालुका शेतकरी पंचायतद्वारे ओबीसी संघर्ष कृती समिती समर्थित शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सोमवारी सकाळी बस स्थानक चौकात मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र आले. या वेळी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, धानाला साडेतीन हजार रूपये हमीभाव मिळालाच पाहिजे, ६० वर्षांवरील शेतकरी-शेतमजुरांना पेन्शन मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती झालीच पाहिजे, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी बाईक रॅलीसुद्धा काढण्यात आली व घोषणा देण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शेतकरी संघटना व ओबीसी संघटना सोमवारपासून जनआंदोलनाच्या स्वरूपात संपावर जात असल्याने शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या व विविध मागण्यांच्या संदर्भात सालेकसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समर्थन करून तहसीलदारांना निवेदन दिले. त्यानुसार, यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ व्हावे, तसेच शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांसदर्भात पक्षाने पुढाकार घेवून धरणे आंदोलन करून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. परंतु शासनाची झोप उघडली नाही. संपूर्ण राज्य शेतकरी कामगार पक्षसुद्धा शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी जनआंदोलन करून शासनाला वेळोवेळी जागृत करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र आज प्रत्यक्ष शेतकऱ्यांवरच संपावर जाण्याची पाळी आली आहे. शेतकऱ्यांच्या संपाचे समर्थन करीत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने घेवून संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, अशी मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. निवेदन देतेवेळी तुकाराम बोहरे, निर्दोष साखरे, निकेश गावड, लक्ष्मण नागपुरे, भरतलाल नागपुरे आदी अनेक शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या
By admin | Published: June 06, 2017 12:59 AM