लवकरच होणार शासकीय कृषी महाविद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 09:59 PM2018-06-15T21:59:55+5:302018-06-15T21:59:55+5:30

गोंदिया विधानसभा क्षेत्रासाठी विकास कामे खेचून आणण्याचे प्रयत्न आम्ही करतो. यातूनच विविध कामे करण्यात आली. त्यामुळे गोंदिया तालुक्याची वाटचाल विकासाकडे सुरू आहे.

Government Agricultural College | लवकरच होणार शासकीय कृषी महाविद्यालय

लवकरच होणार शासकीय कृषी महाविद्यालय

googlenewsNext
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : कारंजा येथील चावडी व नाली बांधकामाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रासाठी विकास कामे खेचून आणण्याचे प्रयत्न आम्ही करतो. यातूनच विविध कामे करण्यात आली. त्यामुळे गोंदिया तालुक्याची वाटचाल विकासाकडे सुरू आहे.शिवाय गावातील युवकांना रोजगारोन्मुख शिक्षण देण्याच्या दृष्टीने येथील कृषी फार्ममध्ये कृषी महाविद्यालय स्थापित करण्यासाठी आमचे प्रयत्न असून लवकरच यात सकारात्मक परिणाम दिसून येणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
जवळील ग्राम कारंजा येथील १० लाख रूपयांच्या निधीतून मंजूर डव्वा येथील रस्ता डांबरी करण्याच्या कामाचे लोकार्पण, ३ लाख रूपयांच्या निधीतून मंजूर वॉर्ड क्रमांक २ मधील सिमेंट नाली व तीन लाख रूपयांच्या निधीतून मंजूर विठ्ठल रूख्मीणी मंदिर चावडी बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी होत्या.
याप्रसंगी मडावी यांनी, आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नाने यंदाच्या पाणी टंचाईच्या परिस्थितीला बघता जिल्ह्यात २३३ विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या. यात १०० विंधन विहिरी गोंदिया तालुक्यातील आहेत. त्यांचे काम अंतीम टप्प्यात असून येणाऱ्या काळात पाणी टंचाईच्या स्थितीत लाभदायी ठरणार असल्याचे यावेळी सांगितले. तसेच या परिसरात भविष्यात सुध्दा विविध विकास कामे करण्यात येणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, स्नेहा गौतम, योगराज उपराडे, प्रकाश रहमतकर, अरूण दुबे, जीवन बंसोड, उर्मिला दहीकर, श्याम कावळे, पुष्पलता मेश्राम, इंदिरा कटरे, दिनेश तिडके, गंगाराम बावनकर, राजा बैस, रवी बोदानी, निशा उईके, अर्चना राऊत, जैतुरा बावने, उपमा पशीने , अशोक लिचडे, अशोक इटानकर, लक्ष्मी निर्वीकार, शिवराम सवालाखे, महेंद्र आंबाडारे, सरफराज गोडील, अरूण ठाकरे, लालजी कोठेवार, महफुस पठाण, कृष्णा बंसोड, संजू अग्रवाल, संजय वैद्य यांच्यासह अन्य उपस्थित होते.
 

Web Title: Government Agricultural College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.