धानाचा ५० टक्के बोनस व ५० हजार प्रोत्साहन राशी लवकरच मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:27 AM2021-07-26T04:27:17+5:302021-07-26T04:27:17+5:30
गोंदिया : महाराष्ट्र सरकार धानाचा ५० टक्के बोनस आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन राशी ...
गोंदिया : महाराष्ट्र सरकार धानाचा ५० टक्के बोनस आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन राशी लवकरच देणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी (दि. २५) पत्रकारांशी बोलताना दिली.
याप्रसंगी पटोले यांनी, ओबींसीच्या जनजगणेसंदर्भात केंद्राने राज्यसभेत ओबींसीची जनगणना करणार नाही आणि ओबीसींची आकडेवारी देणार नाही असे सांगितल्यामुळे भाजप सरकार ओबीसींच्या किती विरोधात आहे हे स्पष्ट होते. महाराष्ट्रात या आठवड्यात पूरपरिस्थती निर्माण झाली. २४ तासात ७०० मिमी. पाऊस पडल्याने त्या ठिकाणची परिस्थिती काय राहणार आहे. अशा परिस्थिती महाराष्ट्रात अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करण्यापेक्षा राजकारण करणाऱ्या लाेकांनी जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. कोरोनाच्या संकटामुळे व्यापाऱ्यांची प्रतिष्ठाने दुपारी ४ वाजतापर्यंत खुली असतात. महामारीच्या प्रकोपामुळे केंद्राने दिलेल्या निर्देशानुसार कोरोनाचे नियम लागू करण्यात आले. महाराष्ट्रात तिसरी लाट येणार असल्याची शक्यता असल्याने या परिस्थितीला हाताळण्यासाठी नियम लागू करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी आमदार सहेसराम कोरोटे, प्रदेश महासचिव अमर वऱ्हाडे, जिल्हाध्यक्ष ॲड. एन.डी किरसान, माजी आमदार दिलीप बन्सोड, गप्पू गुप्ता, रत्नदीप दहिवले व इतर कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.