ग्रामीण भागात फुलली पळस फुलांची बाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:03 AM2018-03-16T00:03:02+5:302018-03-16T00:03:02+5:30
नुकताच हिवाळ संपून उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. होळीे व धूलीवंदनादरम्यान पळस फुलांचा उपयोग ग्रामीण भागात मुले रंग तयार करण्यासाठी करतात.यावर्षी सर्वाधिक पळस फुलले आहेत.
ऑनलाईन लोकमत
बाराभाटी : नुकताच हिवाळ संपून उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. होळीे व धूलीवंदनादरम्यान पळस फुलांचा उपयोग ग्रामीण भागात मुले रंग तयार करण्यासाठी करतात.यावर्षी सर्वाधिक पळस फुलले आहेत. रस्त्याच्या बाजूला लक्षवेधी पळस बाग फुलल्याचे चित्र ग्रामीण भागात सध्या पाहयला मिळत आहे.
खेड्यांचा भाग म्हणजे फळा-फुलांच्या झाडांची भर पडली आहे. कुडूनिंब, संत्रा अशा अनेक वनस्पती बहुगुणी आहे. पळसाचा सुध्दा विविध गोष्टींचा उपयोग केला जातो. या वनस्पतीची खोडे, पाने, फुले, बिया, जाळण्यासाठी लाकडे आदी विविध उपयोग केला जातो. आता सर्वत्र ठिकाणी हा पळस फुलून सर्वांचे लक्ष वेधत आहे. फुलांचा उपयोग रंगपंचमीला रंग तयार करण्यासाठी केला जातो. रंगपंचमीला गरीब घरातील मुले हा आयुर्वेदिक रंग खेळतात. तसेच पळसाच्या बिया जमा करुन आणि त्यांची विक्री करुन पोटाची खळगी भरतात.
खोडापासून तेंदूपत्ता संकलनाचे पुळके बांधतात. तसेच पानापासून समारंभात पत्रावळी तयार करतात. पत्रावळ निर्मितीमुळे ग्रामीण भागात अनेकांना रोजगार मिळत असतो. यावर्षी पळस मोठ्या प्रमाणात फुलल्याचे बोलल्या जाते. ग्रामीण भागातील मुले पळसाच्या वृक्षाखाली मौज मस्ती करताना दिसतात. येरंडी बाराभाटी, बोळदे, कवठा, देवलगाव या परिसरात मोठ्या प्रमाणात पळसाची झाडे असून ती बहरल्याने या परिसराला मनमोहक स्वरुप प्राप्त झाले आहे.