गुरुजी, आज कुणाच्या घरी भरणार शाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:23 AM2021-07-17T04:23:20+5:302021-07-17T04:23:20+5:30

राजेश मुनीश्वर सडक अर्जुनी : पंचायत समिती सडक अर्जुनीअंतर्गत येणाऱ्या राजगुडा येथील शिक्षक आता कोरोना काळात गावातील चावडीवर मुलांना ...

Guruji, whose house will the school fill today! | गुरुजी, आज कुणाच्या घरी भरणार शाळा !

गुरुजी, आज कुणाच्या घरी भरणार शाळा !

Next

राजेश मुनीश्वर

सडक अर्जुनी : पंचायत समिती सडक अर्जुनीअंतर्गत येणाऱ्या राजगुडा येथील शिक्षक आता कोरोना काळात गावातील चावडीवर मुलांना अभ्यासाचे धडे देत आहेत; पण सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शिक्षकांना गावात इतरत्र मुलांना शिकविताना त्रास होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे दररोज एका विद्यार्थ्याच्या घरी शाळा भरून शिकविले जात आहे. त्यामुळे गुरुजी आज कुणाच्या घरी भरणार शाळा, असा प्रश्न विद्यार्थी शिक्षकांना करीत आहेत.

राजगुडा येथील शिक्षक गावात समाजमंदिर व चावडी, अशा पाच ठिकाणी वर्ग घेत असताना दिसतात. समाजमंदिर आणि चावडी या ठिकाणी मुलांना शिकविता येऊ शकते, तर मग मुलांना शाळेत का बोलाविले जात नाही? असा सूरदेखील काही पालकांमध्ये आहे. राजगुडा येथील गावात समाजमंदिर व चावडी, अशा पाच ठिकाणी वर्ग सुरू आहेत, इयत्ता पहिली व दुसरीचे वर्ग पी.एम. बावनकर हे शाळेसमोरील समाजमंदिरात घेतात. इयत्ता तिसरी व चौथीचे वर्ग आर.टी. गोंडाणे हे गावातील समाजमंदिरात घेतात, इयत्ता पाचवीचा वर्ग टी.के. मेश्राम हे गावातील हनुमान मंदिर येथे घेतात, इयत्ता सहावीचा वर्ग सी.बी. गोबाडे हे महेंद्र डोंगरे यांच्या खाली असलेल्या घरामध्ये घेतात. इयत्ता सातवीचा वर्ग वाय.एस. मुंगुलमारे प्रभारी मुख्याध्यापक हे मोहन सूरसाऊत यांच्या घरी घेत आहेत.

...............

शिक्षकांचा प्रस्ताव धूळखात

जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा, राजगुडा येथील पटसंख्या १५२ असून, फक्त पाच शिक्षक कार्यरत आहेत. हे गाव आदिवासीबहुल असून, जंगलव्याप्त परिसरात आहे. विकासापासून कोसो दूर असलेल्या या गावाला विकासाच्या प्रवाहात ठेवायचे असेल, तर निकषानुसार सात शिक्षक असणे आवश्यक आहे. दोन वेळा पंचायत समिती सडक अर्जुनीला शिक्षक मागणीसाठी शिक्षण समितीचा ठराव पाठवूनही शिक्षण समितीच्या ठरावाची दखल घेण्यात आली नाही.

160721\20210707_122220.jpg

फोटो

Web Title: Guruji, whose house will the school fill today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.