‘त्या’ कृषी केंद्र संचालकांना बजावली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 09:25 PM2019-06-22T21:25:28+5:302019-06-22T21:26:13+5:30

सडक अर्जुनी तालुक्यातील काही कृषी केंद्र संचालकांनी बियाणांवर सूट देण्याच्या नावाखाली कूपन देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर कृषी विभागाच्या भरारी पथकाने याची नोंद घेवून सदर कृषी केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.

'That' has been issued to the Director of Agriculture Center | ‘त्या’ कृषी केंद्र संचालकांना बजावली नोटीस

‘त्या’ कृषी केंद्र संचालकांना बजावली नोटीस

googlenewsNext
ठळक मुद्देलोकमतच्या वृत्ताची दखल। अन्यथा परवाना रद्द करणार, बियाण्यांची तपासणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील काही कृषी केंद्र संचालकांनी बियाणांवर सूट देण्याच्या नावाखाली कूपन देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर कृषी विभागाच्या भरारी पथकाने याची नोंद घेवून सदर कृषी केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. नोटीसचे उत्तर दिल्यानंतर परवाना रद्द करण्याची कारवाही करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सडक अर्जुनी तालुक्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. हीच बाब हेरुन विविध बियाणे कंपन्या सुध्दा खरीप हंगामाच्या तोंडावर सक्रीय झाल्या आहेत. खरीपासाठी शेतकऱ्यांना लागणाºया धानाच्या बियाणांची गरज लक्षात घेवून वर्धा येथील यशोदा सिड्स कंपनीच्या एजंटनी तालुक्यातील अनेक शेतकºयांकडून यशोदा १३१२, अहिल्या, हरिमाऊली, अंबिका, चायना राईस, आर.एच.१० या प्रजातीच्या धानाची बुंकीग करुन घेतली. ज्या शेतकऱ्यांनी या धानाची बुंकीग केली त्या शेतकऱ्यांना धानाच्या प्रती बॅगवर १५० रुपयांची सूट मिळेल यासंबंधिचे एक कूपन दिले होते. शिवाय हे कूपन ज्या कृषी केंद्रातून शेतकरी धानाची खरेदी करतील त्या दुकानातून त्यांना सूट दिली जाईल असे सांगितले होते. या कंपनीच्या एजंटनी सडक अर्जुनी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना कुपनचे वितरण करुन बियाणांचे बुकींग करुन घेतले. शेतकऱ्यांनी सुध्दा बियाणे खरेदी करताना आपले चारपाचशे रुपये वाचतील या आशेने धानाची बुकींग करुन घेतली. मात्र प्रत्यक्षात जेव्हा शेतकरी हे कुपन घेवून कृषी केंद्रात धानाचे बुकींग करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना सदर दुकानदार या कंपनीचे बियाणे घेतल्यानंतर सुध्दा कुठलीच सूट देत दिली नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.दिलीप गायकवाड, परसराम राऊत, गोपी भोयर, राजाराम झिंगरे, यशवंत गायकवाड, भाऊराव शेंडे, प्रल्हाद गायकवाड, सुभाष बागडे, छगनलाल खोब्रागडे या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर लोकमतने या संदर्भातील वृत्त प्रकाशित करताच कृषी विभागाच्या भरारी पथकाने सडक अर्जुनी येथील दोन कृषी केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
तसेच कूपन देणे बंद न केल्यास परवाना निलंबित करण्याची तंबी दिली आहे. तसेच नोटीसचे उत्तर दिल्यानंतर पुढील कारवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदकिशोर नयनवाड यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.

सीमावर्ती भागात शोधमोहीम
खरीप हंगामादरम्यान मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधून मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे बाजारपेठेत विक्रीस येण्याची शक्यता असते. त्यामुळे यावर्षी कृषी विभागाच्या भरारी पथकाने सीमावर्ती भागातील गावांमध्ये बियाणांची शोध मोहीम मागील आठवडाभरापासून सुरू केली आहे.

Web Title: 'That' has been issued to the Director of Agriculture Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती