गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, ठाणेदार प्रमोद बघेले यांच्या मार्गदर्शनाखाली हे आरोग्य शिबिर घेण्यात आले. आरोग्य शिबिरास ग्रामीण रुग्णालय, सालेकसाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बघेले, प्राथमिक आरोग्य केंद्र, दरेकसाचे माटे यांनी आपल्या मोबाईल युनिट चमूसह उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली. शिबिरादरम्यान कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण आणि म्युकरमायकोसिसवर मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात मौजा विचारपूर व परिसरातील एकूण १५२ पुरुष, महिला व लहान मुलांची तपासणी करण्यात आली. शिबिरासाठी सशस्त्र दूरक्षेत्र दरेकसाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोळे, पोउपनि इंगोले, पोउपनि नवले तसेच सशस्त्र दूरक्षेत्र दरेकसाचे सर्व पोलीस अंमलदार यांनी सहकार्य केले.
नक्षलग्रस्त भागात आरोग्य शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 4:20 AM