महामार्ग ठरतोय कर्दनकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 09:48 PM2020-01-01T21:48:22+5:302020-01-01T21:48:43+5:30
देवरीपासून आमगाव मार्गे या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करण्यात येत आहे. पदमपूरच्या पोवारीटोला ते आमगावच्या नाबार्ड बोर्डपर्यंत या रस्त्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. रस्ता तयार करतांना एका बाजूचा रस्ता तयार करून दुसºया बाजूने प्रवाश्यांना सहजरित्या प्रवास करता येईल, अशी सोय करायला हवी होती. परंतु तसे न करता संपूर्ण रस्ता खोदून टाकला. वाटसरूंना जाण्या-येण्यासाठी मुरूम व माती टाकण्यात आली. परंतु मुरूमामध्येही चिकण माती मिश्रीत असल्यामुळे पाण्याने मुरूम ओले होऊन त्यावरून वाहने गेल्यास वाहने घसरतात. त्यामुळे वाहन चालकांचा अपघात होतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया येथे देवरी-आमगाव मार्गे येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम नियोजन शून्य होत आहे. या मार्गावर एक किमी अंतरात अवघ्या १४ तासात २० जण जखमी झाले आहेत. याकडे सदर यंत्रणेने दुर्लक्ष केल्यास या ठिकाणी प्राणांतीक अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
देवरीपासून आमगाव मार्गे या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करण्यात येत आहे. पदमपूरच्या पोवारीटोला ते आमगावच्या नाबार्ड बोर्डपर्यंत या रस्त्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. रस्ता तयार करतांना एका बाजूचा रस्ता तयार करून दुसºया बाजूने प्रवाश्यांना सहजरित्या प्रवास करता येईल, अशी सोय करायला हवी होती. परंतु तसे न करता संपूर्ण रस्ता खोदून टाकला. वाटसरूंना जाण्या-येण्यासाठी मुरूम व माती टाकण्यात आली. परंतु मुरूमामध्येही चिकण माती मिश्रीत असल्यामुळे पाण्याने मुरूम ओले होऊन त्यावरून वाहने गेल्यास वाहने घसरतात. त्यामुळे वाहन चालकांचा अपघात होतो. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता पाऊस आल्याने आमगावच्या नाबार्ड बोर्डपासून धम्मगीरी या एक किमीच्या अंतरावर सायंकाळी ७ वाजता पासून १ जानेवारी २०२० च्या सकाळी ९ वाजता या १४ तासाच्या आत २० पेक्षा अधिक जण पडले. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
चिखलातून मार्गक्रमण करावा लागत असतांना वाहने घरून त्यावरून चालक व मागे बसलेले लोक पडतात. या मार्गावरून जातांना सर्वात जास्त अपघात मोटारसायकल चालकांचा होत आहे. चिकण माती मिश्रीत मुरूम टाकल्यामुळे दुचाकी सहज घसरते. परिणामी अपघात होतात. या महामार्गाचे बांधकाम करतांना वाटसरूंची येण्या-जाण्याचा रस्ता सोयीस्कर करूनच बांधकाम करणे अपेक्षीत होते. परंतु तसे होत नसल्याने अनेकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागते. याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाहीत. या रस्त्यावर रात्रीपासून सकाळपर्यंत झालेल्या अपघातामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे.
अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटली
या महामार्गाचे बांधकाम करतांना बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची मोठी पाईप लाईन अनेकदा फुटली. बांधकाम करतांना जेसीबीच्या माध्यमातून खोदकाम करण्यात येत असल्यामुळे जेसीबीने पाईप फुटले आहेत.त्यामुळे अनेक ठिकाणचा पाणी पुरवठा बंद असतो. मुख्य पाईप लाईन फुटली की सर्वच गावांचा पाणी पुरवठा बंद होतो. पाईप फुटल्यानंतर हा महामार्ग बणविणारे पाईपची दुरूस्ती करून देतात. परंतु मागील वर्षभरापासून दोन-चार दिवसात पाईप फुटण्याचा प्रकार सुरू आहे.त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.
२५ हजार ब्रास मुरुमाची मंजुरी पण वापरले किती?
राष्ट्रीय महार्गासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २५ हजार ब्रास मुरूम तालावातून काढण्याची मंजुरी देण्यात आली आहे. परंतु या रस्त्यावर वापरण्यात येणारे मुरूम तलावातील नाही. तलाव खोलीकरण करून त्यातील मुरूम या ठिकाणी वापरण्यात यावे अश्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना होत्या. परंतु तसे न करता भलत्याच ठिकाणी खोदकाम करून मुरूमाचा वापर केला जात आहे. २५ हजार ब्रास मुरूम वापरण्याची मंजुरी देण्यात आली. परंतु या ठिकाणी वापरण्यात आलेले मुरूम लाखो ब्रासच्या घरात आहे. याकडे जिल्हाधिकाºयांनी जातीने लक्ष घालण्याची गरज आहे.
जिल्हाधिकारी महोदय, मुरुमाची चौकशी कराच
देवरी ते आमगाव मार्गे तयार होणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी वापरण्यात आलेले मुरूम कुठून काढण्यात आले. किती ब्रास मुरूम काढण्यात आले याची सर्व चौकशी जिल्हाधिकारी यांनी केल्यास किती मुरूम अधिक काढण्यात आले ही बाब पुढे येईल. या बांधकामाच्या नावाने अनेक अधिकाऱ्यांचे हात ओले झाल्यामुळे कुणीच याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत.