लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेतीवरच अवलंबून राहू नये. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी हातामध्ये पैसा खेळता राहावा म्हणून दुग्ध व्यवसायाची कास धरणे गरजेचे आहे. दुध, दुभत्या जनावरांची संख्या वाढवून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केल्यास आर्थिक विकास साधणे सहज शक्त होईल असे प्रतिपादन येथील जय भवानी व्यवसायीक सहकारी संस्थेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले.दुध संकलन केंद्रात संस्थेच्यावतीने आयोजित दुग्ध उत्पादकांना साहीत्य वाटप कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष भुमेश्वर मलखांबे, संचालक पंढरी लोगडे, प्रमोद पाऊलझगडे, एकनाथ राखडे, गोवर्धन राखडे, उदाराम राखडे, दुर्गा राखडे, रामकला हुकरे, माजी सरपंच मोरेश्वर सोनवाने, हेमराम लोगडे, अंताराम राखडे उपस्थित होते. पुढे बोलताना भेंडारकर यांनी,गावखेड्यात शेतीला जोडधंदा उपलब्ध व्हावा. सहकारच्या माध्यमातून ग्रामीण जनतेचा सर्वांगिण विकास व्हावा या हेतुनी स्व.महादेव लोगडे यांनी चान्ना येथे जय भवानी व्यवसायिक सहकारी संस्थेची स्थापना ३५ वर्षांपूर्वी करुन बोंडगावदेवी येथे दूध संकलन केंद्र सुरु केले होते.आज संस्थेने गरुड झेप घेऊन चान्ना व बोंडगावदेवी येथे दूध संकलन केंद्र सुरु करुन दुध उत्पादकांना दुधाचा भाव जास्तीत-जास्त मिळण्यासाठी संस्थेच्यावतीने प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.दरम्यान, दूध उत्पादकांना पाहुण्यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. संचालन संस्थेचे व्यवस्थापक मार्कंड लांजेवार यांनी केले. आभार रामकृष्ण राखडे यांंनी मानले. कार्यक्रमाला दुग्ध उत्पादक, संस्थेचे सदस्य उपस्थित होते.
दुग्ध व्यवसायाची कास धरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 10:01 PM
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेतीवरच अवलंबून राहू नये. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी हातामध्ये पैसा खेळता राहावा म्हणून दुग्ध व्यवसायाची कास धरणे गरजेचे आहे. दुध, दुभत्या जनावरांची संख्या वाढवून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केल्यास आर्थिक विकास साधणे सहज शक्त होईल असे प्रतिपादन येथील जय भवानी व्यवसायीक सहकारी संस्थेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले.
ठळक मुद्देलायकराम भेंडारकर : दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना साहित्य वाटप