वीज कर्मचाऱ्यांचे धरणे
By Admin | Published: August 23, 2016 01:55 AM2016-08-23T01:55:53+5:302016-08-23T01:55:53+5:30
वीज कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी राज्यव्यापी धरणे आंदोलन केले. यात वीज
गोंदिया : वीज कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी राज्यव्यापी धरणे आंदोलन केले. यात वीज निर्मिती, पारेषण व वितरण या तीनही कंपन्यांचे कर्मचारी व अभियंते सहभागी झाले होते.
धरणे देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रामुख्याने केलेल्या मागण्यांमध्ये राज्यातील महानिर्मितीचे सर्व संच पूर्ण क्षमतेने सुरू करा व या प्रकरणी संघटनांशी चर्चा करा, तीनही कंपन्यांच्या स्टॉपचे सेटअफ व निकष निश्चित करा, वितरण कंपनीचे प्रादेशिक विभाग करण्याचा फेरविचार करा. तीनही कंपन्यातील कर्मचाऱ्यांचे बदली धोरण चर्चा करून ठरवा. तीन्ही कंपन्यांमधील रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या मागण्यांकरिता राज्यातील प्रमुख २० संघटना एकत्रितपणे लढा देत आहेत. दि.८ ते २० आॅगस्ट यादरम्यान सर्व वीज क्षेत्रातील तीनही कंपन्यांचे विभाग, प्रविभाग, झोनसमोर रोज द्वारसभा घेऊन निषेध सभा घेण्यात आल्या. गोंदियात दि.२२ ला तीनह्ी कंपनीच्या परीमंडळ कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. दि.३० ला वीज संघटनांचे केंद्रीय पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य प्रकाशगड या मुख्य वीज कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत. दुपारनंतर महापारेषणच्या मुख्य कार्यालयासमोरने धरणे देतील. (जिल्हा प्रतिनिधी)