इंग्रजी शिकविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:18 AM2021-02-19T04:18:16+5:302021-02-19T04:18:16+5:30
यावेळी राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री शिक्षणमंत्री बचू कडू, माजी प्रधान सचिव नंदकुमार, माजी सनदी अधिकारी मिताली सेठी, अपेक्षा होमिओ ...
यावेळी राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री शिक्षणमंत्री बचू कडू, माजी प्रधान सचिव नंदकुमार, माजी सनदी अधिकारी मिताली सेठी, अपेक्षा होमिओ सोसायटीचे संचालक डॉ. मधुकर गुम्बळे, विलास शेंडे, प्राचार्य डॉ. सुभाष गवई उपस्थित होते. विदर्भातील ११ जिल्हे व प. महाराष्ट्रातील १ असे एकूण ३९ तालुक्यातील ११६० शाळांमध्ये इंग्लिश ई- टीच हा कार्यक्रम बीसीपीटीच्या सहकार्याने उदय नानकर, संदीप मडामे, गोंदिया अंतर्गत चाईल्ड राईट अलायन्सच्या माध्यमातून हा उपक्रम मागील तीन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. कोरोनाचे संकट आले व संपूर्ण जग थांबलं. शाळा थांबल्या, शिक्षक, विद्यार्थी सर्व हतबल झाले. ग्रामीण भागातील गरीब, वंचित, शोषित व शेवटच्या घटकातील मुलांचे शैक्षणिक दृष्टीने फार मोठे नुकसान होताना दिसत होते. गावापातळीवर ऑफलाईन, ऑनलाईन इंग्लिश ई-टीच वर्ग गावपातळीवर सुरू केले आणि आजही या मुलासोबत अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सोमलपूर व भुरसीटोला या गावांत सरपंच लिलेश्वर खुणे यांच्या सहकार्याने वर्ग सुरू आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यामधील संदीप मडामे यांचा सत्कार करण्यात आला.