ठाणेगावातील घर जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 08:54 PM2018-10-20T20:54:16+5:302018-10-20T20:54:44+5:30
जवळील ठाणेगाव येथील अरुण पवनकर यांच्या घराला आग लागल्याने त्यांचे घर जळून खास झाले. बुधवारी (दि.१७) सायंकाळी ७ वाजतादरम्यान ही घटना घडली असून यात पवनकर कुटुंबीयांचे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सुकडी-डाकराम : जवळील ठाणेगाव येथील अरुण पवनकर यांच्या घराला आग लागल्याने त्यांचे घर जळून खास झाले. बुधवारी (दि.१७) सायंकाळी ७ वाजतादरम्यान ही घटना घडली असून यात पवनकर कुटुंबीयांचे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले.
प्राप्त माहितीनुसार, ग्राम ठाणेगाव येथील अरुण ताराचंद पवनकर हे बुधवारी (दि.१७) आपल्या मोठ्या मुलाच्या घरी गेले होते. त्यांच्या घरी कुणीही नसताना रात्री ८.३० वाजतादरम्यान अचानक घराला आग लागली. या आगीमुळे संपूर्ण घर व घरातील अन्न-धान्यासह सर्वच सामान व दागदागिने जळाले. सुसुंदरीने दिव्याची ज्योत पळविल्याने घराला आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अदानी पावर प्लांटमधील अग्नीशामक दलाला गावकऱ्यांच्या मदतीच्या सहकार्याने आग विझविण्यात आली. या आगीमुळे संपूर्ण कुटूंब उघडयावर आले असून अंगावरील कापडांशिवाय त्यांच्याकडे काहीच उरले नाही. याबाबत तहसीलदार संजय रामटेके यांना माहिती देण्यात आली असता त्यांनी तलाठी पी.ए.मुडे यांना पाठविले व त्यांनी घराचा पंचनामा केला. यावेळी सर्व साहित्य जळल्यामुळे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली.
यावेळी जि.प.सदस्य प्रिती रामटेके, सरपंच अनिता रहांगडाले, उपसरपंच डुलेश्वरी शहारे, ग्रा.पं.सदस्या पुष्पा खोब्रागडे, मंगला खोब्रागडे, चारुशिला कनोजे, भाऊराव बंसोड, के.एस.पटले, अनिल शहारे, मानिक खोब्रागडे, तिरोडा तालुका काँग्रेसचे अनु.जातीचे अध्यक्ष हितेंद्र जांभुळकर, आनंदराव खोब्रागडे, आशिष टेंभरे, बिसन रेहकवार, जवाहरलाल खंडार, मंगला खोब्रागडे, अरुण रहांगडाले, ग्रा.पं.सर्व पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते व पवनकर यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे.