पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करणारे शेतकरी हितेशी कसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:31 AM2021-05-27T04:31:17+5:302021-05-27T04:31:17+5:30
गोंदिया : कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षभरापासून शेतकरी संकटाला तोंड देत आहे. अशात केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने ...
गोंदिया : कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षभरापासून शेतकरी संकटाला तोंड देत आहे. अशात केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ केल्याने महागाई प्रचंड वाढली. याचे चटके सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांनासुद्धा बसले. खताच्या दरातसुद्धा भरमसाठ वाढ केली. मात्र, यावरून टीका झाल्यानंतर दर कमी केले. शेतकरी संकटात असताना त्यांचा विचार न करता दरवाढ करणारे भाजप सरकार शेतकरी हितेशी कसे, असा सवाल माजी आ. राजेंद्र जैन आणि आ. मनाेहर चंद्रिकापुरे यांनी केला आहे.
भाजपचे काही पदाधिकारी शेतकरी हितेशी असल्याचे सांगत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका करीत आहेत. रखडलेली धान खरेदी, धानाच्या बोनसवरून टीका करीत आहेत. मात्र, महाराष्ट्रात भाजपचे सरकार असताना त्यांनी कधी धानाला ७०० बोनस? दिला का, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले का, आता मात्र भाजपकडे मुद्दे नसल्याने विरोधाला विरोध म्हणून टीका करून आपण शेतकरी हितेशी असल्याचा आव आणत आहेत. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. भाजपने टीका करण्याऐवजी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य द्यावे, पेट्रोल, डिझेलचे दर कसे कमी होतील या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. खा. प्रफुल्ल पटेल यांनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत धानाला प्रथमच प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस? मिळवून दिला. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यालाच नेहमी प्राधान्य दिले. त्यामुळे भाजपने टीकेचे राजकारण करण्याऐवजी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविल्यास शेतकऱ्यांना त्याची मदत होईल असा सल्ला माजी आ. राजेंद्र जैन, आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी दिला आहे.