ज्ञान प्राप्तिसाठी शालेय वाचनालयांना महत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 06:00 AM2019-09-23T06:00:00+5:302019-09-23T06:00:28+5:30
पूर्व तयारी शालेय जिवनापासूनच होणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा तयारीसाठी सखोल ज्ञानाची आवश्यकता असते. यासाठी प्रत्येक शाळेत सुसज्ज वाचानालय उपलब्ध असणे गरजेचे आहे. कारण, सखोल ज्ञान प्राप्तीसाठी शालेय वाचनालयांना अनन्यसाधारण महत्व असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
खजरी : सध्याचे युग संगणकाचे आहे. प्रचलीत शासकीय धोरणानुसार भविष्यात स्थिर होण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना अनेक स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. त्याची पूर्व तयारी शालेय जिवनापासूनच होणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा तयारीसाठी सखोल ज्ञानाची आवश्यकता असते. यासाठी प्रत्येक शाळेत सुसज्ज वाचानालय उपलब्ध असणे गरजेचे आहे. कारण, सखोल ज्ञान प्राप्तीसाठी शालेय वाचनालयांना अनन्यसाधारण महत्व असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी केले.
येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आदिवासी विकास हायस्कूल व कला, विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयांतर्गत हे वाचनालय परशुरामकर यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेले आहे. अध्यक्षस्थानी जगत कल्याण शिक्षण संस्थेचे सचिव एन.एन.येळे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समीती उपसभापती राजेश कठाणे, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष छाया चव्हाण, भंडारा जिल्ह्याचे ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे, सरपंच सत्यशीला गायकवाड, प्राचार्य खुशाल कटरे, उपसरपंच नरेंद्र देहारी, पर्यवेक्षक आर.के.कटरे, उमावि प्रभारी प्रा.योगराज परशुरामकर, माजी उपसरपंच उमराव मांढरे यांच्यासह सर्व शालेय समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी बोपचे यांनी, कोणत्याही विषयाची माहिती व ज्ञान यात फरक असतो. माहिती इतर माध्यमातून प्राप्त होण्यासाठी संधी उपलब्ध आहे. परंतु विषयाचे सखोल ज्ञान वाचनालयात उपलब्ध ग्रंथांमधूनच शक्य असल्याचे मत व्यक्त केले.
प्रास्ताविक प्राचार्य कटरे यांनी मांडले. संचालन सहायक शिक्षक जि.टी.लंजे यांनी केले. आभार प्रा.वाय.टी.परशुरामकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी डी.डी.रंहागडाले, सी.एस.ब्राम्हणकर, प्रा.सुरज रामटेके, ए.डी.मेश्राम, व्हि.एस.राठोड, आर.यु.गौतम यांनी सहकार्य केले.