संविधान साक्षर ग्रामचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 06:00 AM2019-11-28T06:00:00+5:302019-11-28T06:00:24+5:30
जिल्ह्यातील खमारी या गावाची निवड संविधान साक्षर ग्राम म्हणून करण्यात आली. संविधान साक्षर ग्रामचे उद्घाटन सरपंच आशा तावाडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम विद्यालयाचे प्राचार्य व्ही.जे.रावते हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास अधिकारी एस.जे.बागडकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राचे पूजन व माल्यार्पण करुन करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
निंबा : खेड्यापाड्यातील सर्व जाती, धर्माच्या लोकांसह महिलांनी भारतीय राज्यघटना कळावी, त्यात दिलेले न्याय, समता, बंधुत्व आणि एकात्मता हे मूलभूत हक्क समजावेत यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी)च्या ‘समतादूत’ प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यभर संविधान साक्षर ग्राम उपक्रमाची सुरुवात २६ नोव्हेंबर रोजी ७० व्या संविधान दिनाचे औचित्य साधून करण्यात आले.
जिल्ह्यातील खमारी या गावाची निवड संविधान साक्षर ग्राम म्हणून करण्यात आली. संविधान साक्षर ग्रामचे उद्घाटन सरपंच आशा तावाडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम विद्यालयाचे प्राचार्य व्ही.जे.रावते हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास अधिकारी एस.जे.बागडकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राचे पूजन व माल्यार्पण करुन करण्यात आली. या वेळी सर्वांना संविधानाची शपथ देण्यात आली. याप्रसंगी गावातून प्रभातफेरी काढून विविध घोषवाक्ये देत संविधानाची जनजागृती करण्यात आली. प्रभातफेरीचे संचालन निखील मानकर, उमेश लांजेवार, रजत उके, आशिष मंडिया या विद्यार्थ्यांनी केली. संविधान साक्षर ग्रामच्या उद्घाटनासाठी शिक्षक रंगारी, बोरकर, लाडे, धोटे, फुंडे, सारंगपुरे, रहांगडाले, ओगारे, चौधरी, बागडे, पारधी, गडवार, चव्हाण, बुडेकर यांनी सहकार्य केले. संविधान साक्षर ग्राम उपक्रमांतर्गत खमारी येथे संपूर्ण महिनाभर स्वच्छता अभियान, नागरिक व बचत गटांना माहिती, आरोग्य शिबिर समाजकल्याणच्या योजनांची माहिती असे विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत.
बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे, नागपूर विभागीय प्रकल्प संचालक पंकज माने, गोंदिया जिल्हा प्रकल्प अधिकारी योगीता ब्राम्हणकर यांच्या मार्गदर्शनात गोंदिया जिल्ह्यातील समतादूत करुणा मेश्राम, शारदा कळस्कर, मुनेश रहांगडाले, मनिष बिजेवार यांनी सहकार्य केले.