तांत्रिक कारणास्तव अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचा समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:32 AM2021-09-22T04:32:17+5:302021-09-22T04:32:17+5:30

तिरोडा : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ऑनलाइन यादीत अपात्र दर्शवीत असलेल्या लाभार्थ्यांच्या यादीचे प्रशासनाच्या देखरेखीत ग्रामसभेत वाचन करून त्यांना पुनः ...

Include beneficiaries who are ineligible for technical reasons | तांत्रिक कारणास्तव अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचा समावेश करा

तांत्रिक कारणास्तव अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचा समावेश करा

Next

तिरोडा : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ऑनलाइन यादीत अपात्र दर्शवीत असलेल्या लाभार्थ्यांच्या यादीचे प्रशासनाच्या देखरेखीत ग्रामसभेत वाचन करून त्यांना पुनः पात्र करून लाभ देण्यात यावा. जेणेकरून गरजूंना आवास योजनेचा लाभ मिळेल. याकरिता प्रत्येक तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांना आदेश देऊन हे प्रकरण तत्काळ मार्गी लावावे याबाबत आमदार विजय रहांगडाले यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांना पत्र दिले आहे. यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी येत्या ८ दिवसांत हा विषय मार्गी लावण्याबाबत त्यांना कळविले आहे.

पंतप्रधान आवास योजेनेंतर्गत गरजूंना निवासाकरिता आवास योजेनेचा लाभ मिळण्याकरिता पंतप्रधान आवास योजना केंद्र शासनाकडून राबविण्यात येत आहे. याद्वारे लाभार्थ्यांचा सर्व्हे करून सुरुवातीला प्रपत्र-ड यादीत नावे समाविष्ट करण्यात येतात व त्या यादीला ग्रामसभेत मंजूर करून वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येते. सन २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात अशा पात्र लाभार्थ्यांची नावे पाठविण्यात आली; परंतु सर्व्हेनुसार तांत्रिक चुकींमुळे बहुतांश लाभार्थ्यांची नावे ऑनलाइन प्रकाशित झालेल्या यादीत दिसत नसल्याने कित्येक गावांत पाठविलेल्या संख्येच्या फक्त १ टक्केच नावे आहेत. जसे की तिरोडा तालुक्यात डोंगरगाव ख. येथे २८७ लाभार्थ्यांची नावे पाठविण्यात आली; परंतु यापैकी २ लाभार्थ्यांची नावे पात्र यादीत असून, उर्वरित २८५ अपात्र ठरलेली आहेत, तसेच गोरेगाव तालुक्यातील गणखैरा गावात ५१२ पैकी ७ लाभार्थ्यांची नावे समाविष्ट आहेत.

हा प्रकार जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात असून, याकरिता ऑनलाइन करताना संबंधित तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे. लाभार्थी प्रचंड प्रमाणात रोष व्यक्त करीत असल्यामुळे सरपंच अडचणीत आले आहेत. याची दखल घेत आमदार रहांगडाले यांनी ही बाब मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली असून, ऑनलाइन यादीत तांत्रिक कारणास्तव अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचा समावेश करा, असे पत्र दिले आहे.

Web Title: Include beneficiaries who are ineligible for technical reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.