कीडीमुळे पीक धोक्यात

By admin | Published: August 26, 2016 01:25 AM2016-08-26T01:25:53+5:302016-08-26T01:25:53+5:30

यावर्षीही लहरी पावसाचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. दुबार पेरणी करण्याची पाळी ओढवली

Insect Dangers | कीडीमुळे पीक धोक्यात

कीडीमुळे पीक धोक्यात

Next

खोडकीडा व लष्करी अळी : ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना देणार कीटकनाशक
गोंदिया : यावर्षीही लहरी पावसाचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. दुबार पेरणी करण्याची पाळी ओढवली असतानाही शेतकऱ्यांनी पेरणी केली. पावसाच्या अभावाने काही ठिकाणी आवत्याही टाकण्यात आल्या. मात्र आता शेतकऱ्यांच्या संकटात पुन्हा भर पडून सध्या भापपिकांवर खोडकिडा व लष्कळी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळणार की नाही, याची चिंता बळीराजाला सतावत आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी गोंदिया व सडक-अर्जुनी या दोन तालुक्यांत भातपिकांवर खोडकिडा (वायएसबी) व लष्करी अळी यांचा प्रादुर्भाव आढळला आहे. मागील आठ दिवसांपूर्वी गोंदिया तालुक्याच्या आसोली व परिसरात खोडकिड्याचा प्रादुर्भाव आढळला होता. मात्र कृषी विभागाच्या सल्ल्याने व औषधाने सध्या ही कीड नियंत्रणात असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
सद्यस्थितीत सडक-अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार, ब्राह्मणी, रेंगेपार, खोबा व जवळील परिसरात खोडकिडा व लष्कळी अळींनी धानपिकांना ग्रासले आहे. मात्र ते आर्थिक नुकसान पातळीच्या आत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे म्हणणे आहे. तरीही शेतकऱ्यांचे नुकसान होणार, यात शंका नाही.
यावर प्रतिबंध घालण्यासाठी कृषी विभागाने ५० टक्के अनुदानावर औषधी उपलब्ध करून दिली आहे. यात सीओसी औषध ३११ किलो व क्लोरोपायरीफास्ट ३०४ लिटर संपूर्ण जिल्ह्याकरिता उपलब्ध करून दिले आहेत. लष्करी अळींच्या प्रतिबंधासाठी चार हजार लिटर डायक्लोरोवास्ट ही औषधी ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कृषी विभागामार्फत विभागीय कृषी सहसंचालकांकडे मागणी करण्यात आली आहे. सध्या शेतीला पावसाची गरज आहे. पाऊस न पडल्यास व योग्य प्रमाणात उन्ह न निघाल्यास रोगांचा प्रादुर्भाव आणखी होण्याची दाट शक्यता आहे.

१०४ टक्के लागवड
गोंदिया तालुक्यात रोवणी ३६०१३.७ हेक्टरमध्ये, गोरेगाव २०,३७४ हेक्टर, सालेकसा १५,७९२ हेक्टर, तिरोडा २७,९६५ हेक्टर, आमगाव १८,४४० हेक्टर, अर्जुनी-मोरगाव २१,६७२ हेक्टर, सडक-अर्जुनी १८,२८० हेक्टर, तर देवरी तालुक्यात १६,२१४ हेक्टरमध्ये रोवणीचे काम आटोपले आहे.
आवत्या गोंदिया तालुक्यात १८७७.६ हेक्टर, गोरेगाव ५०३ हेक्टर, सालेकसा ९२६ हेक्टर, तिरोडा २४४ हेक्टर, आमगाव २८९ हेक्टर, अर्जुनी-मोरगाव ७३५.२ हेक्टर, सडक-अर्जुनी ८०२ हेक्टर व देवरी तालुक्यात ५,१२६ हेक्टरमध्ये घालण्यात आल्या. जिल्ह्यात एक लाख ७४ हजार ७५०.७ हेक्टरमध्ये रोवणी व १० हजार ५०२.८ हेक्टरमध्ये आवत्या टाकण्यात आल्या असून रोवणी व आवत्या मिळून एकूण लागवड १०४ टक्के झालेली आहे.

Web Title: Insect Dangers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.