सेजगाव येथील तलाव खोलीकरण कामाची मुकाअकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:02 AM2018-03-17T00:02:59+5:302018-03-17T00:02:59+5:30

तालुक्यातील ग्राम सेजगाव येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तलाव खोलीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. अंदाजीत २० लक्ष रुपयांचे हे काम असून या कामावर गावातील सुमारे ५०६ मजूर आहेत.

Inspection of the lake in Sejgaon by the municipality | सेजगाव येथील तलाव खोलीकरण कामाची मुकाअकडून पाहणी

सेजगाव येथील तलाव खोलीकरण कामाची मुकाअकडून पाहणी

Next
ठळक मुद्देमजुरांशी साधला संवाद: कामावर ५०६ मजुरांची उपस्थिती

ऑनलाईन लोकमत
तिरोडा : तालुक्यातील ग्राम सेजगाव येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तलाव खोलीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. अंदाजीत २० लक्ष रुपयांचे हे काम असून या कामावर गावातील सुमारे ५०६ मजूर आहेत. बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी व उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या कामाला भेट देऊन कामाची पाहणी केली. तसेच मजुरांच्या समस्यांविषयी माहिती घेतली. यावेळी सरपंच कंठीलाल पारधी तसेच ग्राम सचिव उपस्थित होते.
जिल्ह्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाने मनरेगाच्या कामाला प्राधान्य देत विविध कामांना सुरुवात केली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावरील ५० टक्के कामे सुरु करण्यात आली आहे. या कामांमध्ये घरकुल कामांचाही समावेश आहे. यासह पांदन व सिमेंट रस्ते, भात खाचर, नाला सरळीकरण यासारखी कामे ग्रामपंचायत स्तरावर सुरु आहेत.
ही कामे योग्यरित्या होत आहेत की नाही, तसेच गावातील गरजू नागरिकांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला की नाही, याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी कामाच्या स्थळी जाऊन घेत आहेत. त्या अनुषंगाने बुधवारी (दि.१४) त्यांनी ग्राम सेजगाव येथील तलाव खोलीकरणाच्या कामावर जाऊन त्या कामाची पाहणी केली. तसेच संपूर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपसभापती डॉ. किशोर पारधी, ग्रामसेवक पी.एम.गौतम, उपसरपंच स्वप्नील महाजन, ग्राम रोजगार सेवक मोहन पारधी आदी उपस्थित होते.

Web Title: Inspection of the lake in Sejgaon by the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.