तलावांचा जिल्हा पाण्यासाठी कासाविस

By admin | Published: March 22, 2016 02:17 AM2016-03-22T02:17:57+5:302016-03-22T02:17:57+5:30

तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिध्द असलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या मुख्यालयी केटीएस सामान्य जिल्हा रूग्णालय, बाई

Kasavis for water of ponds | तलावांचा जिल्हा पाण्यासाठी कासाविस

तलावांचा जिल्हा पाण्यासाठी कासाविस

Next

गोंदिया : तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिध्द असलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या मुख्यालयी केटीएस सामान्य जिल्हा रूग्णालय, बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय किंवा बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने रूग्णांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागते. रुग्णसेवेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना पिण्याच्या पाण्याची सोय होऊ नये, ही बाब दुर्दैवी ठरत आहे.
गोंदिया एसटी बसच्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी हॉटेल, दुकानवर अवलंबून राहावे लागते. ज्यांची हॉटेलमध्ये पाय ठेवायची ऐपत नाही त्यांना एखाद्या घरातून पिण्याचे पाणी मागून आपली तहान भागवावी लागते.
जिल्ह्यातील साडेतेरा लाख लोकसंख्येसाठी कोट्यवधी रुपये खर्चुनी जिल्हा सामान्य रूग्णालय उभारण्यात आले. येथे दररोज रूग्णांची गर्दी असते. परंतु रूग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची येथे सोय नाही. गंगाबाई रुग्णालयात बाहेरील बोअरवेलचे अशुद्ध पाणी आणून रूग्णाचे नातेवाईक स्वयंपाक करतात. तर काही जण बाहेरून जेवनाचा डबा बोलावतात. त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने बाहेरून पाणी आणावे लागते.
रूग्णांच्या नातेवाईकांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी समोरील रस्ता ओलांडून जावे लागते. हा रस्ता वर्दळीचा असल्याने अपघातही होऊ शकतो. केटीएसमधील पिण्याच्या पाण्याची भिषण समस्या रूग्णांच्या नातेवाईकांसाठी जीवघेणी ठरू शकते.
बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात फक्त एकच नळ रूग्णांच्या नातेवाईकांसाठी आहे. एक बोरवेल आहे. परंतु ती सुद्धा बंद पडली असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या रूग्णांच्या शेकडो नातेवाईकांना रुग्णालयाच्या बाहेरील बोरवेलवरून पाणी आणावे लागते. विशेष या या रुग्णालयाच्या बाहेर विविध भागातून गोळा केलेला कचरा उघड्यावर टाकला जातो. तिथे अतिशय घाण परिसर आहे. जुन्या बोअरवेलमध्ये औषधी टाकली जात नसतानाही येथील पाणी रूग्णांचे नातेवाईक वापरत आहेत. त्यामुळे ते आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गोंदिया शहरातील बसस्थानक दरवर्षी कोट्यवधीचा नफा देणारे आहे. प्रवाश्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने प्रवाश्यांना पाण्याच्या शोधासाठी इतरत्र भटकावे लागते. या बस स्थानकावरील प्रवाश्यांना पाण्यासाठी रस्ता ओलांडून हॉटेलमधून किंवा इतर ठिकाणातून पाणी आणण्याचा प्रयत्न होत असताना अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी जीव कासावीस होत असताना रुग्णांच्या नातेवाईकांना, प्रवाशांना भटकावे लागण्याची वेळ येऊ नये, अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Kasavis for water of ponds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.