कुकडे यांनी घेतली पवार यांची सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 10:00 PM2018-06-04T22:00:06+5:302018-06-04T22:00:45+5:30

भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांनी खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत राष्टÑवादी काँग्रेस ुपक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओक निवास येथे सोमवारी (दि.४) सदिच्छा भेट घेतली. या वेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

Kukade gifted a wishful greetings to Pawar | कुकडे यांनी घेतली पवार यांची सदिच्छा भेट

कुकडे यांनी घेतली पवार यांची सदिच्छा भेट

Next
ठळक मुद्देविविध विषयांवर चर्चा : गुरूवारी घेणार पदाची शपथ

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांनी खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस ुपक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओक निवास येथे सोमवारी (दि.४) सदिच्छा भेट घेतली. या वेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
पवार यांनी कुकडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करुन विजयाच्या शुभेच्छा दिल्या. कुकडे यांच्यासोबत माजी आमदार राजेंद्र जैन, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, धनंजय दलाल उपस्थित होते. कुकडे हे येत्या गुरूवारी (दि.७) खासदारपदाची शपथ घेणार आहेत. यावर सुद्धा यावेळी पवार यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गोंदिया-भंडारा जिल्ह्यात पक्षाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने काय करता येईल, तसेच पक्षाची चांगली बांधणी करुन आगामी निवडणुकांना कसे सामोरे जायचे यावर चर्चा झाली.
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीतील विजयावर सुद्धा या वेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपा-पिरीपा या सर्वांनी एकत्र येवून निवडणूक लढण्यामुळे विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे तसेच या सर्व पक्षांचे प्रत्येक नेता व पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचे फलीत असल्याचे पवार यांना सांगितले. सुप्रिया सुळे यांनी सुद्धा यावेळी कुकडे यांच्यासह इतर उपस्थितांसह संवाद साधला.

Web Title: Kukade gifted a wishful greetings to Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.