शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
2
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
3
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
4
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
5
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
6
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
7
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
8
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
9
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
10
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
11
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
12
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
13
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
14
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
15
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
16
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
17
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
18
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
19
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
20
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं

समृद्धी महामार्गासाठी जमिनी संपादित करण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 3:37 PM

महामार्गामुळे शेतजमिनीचे दर आकाशाला : जिल्ह्यातही येणार समृद्धी

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा आता गोंदियापर्यंत विस्तार करण्यात येत आहे. या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली असून, जिल्ह्यातील तिरोडा, गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या महामार्गाच्या विस्ताराने गोंदिया ते मुंबई हे अंतर ८ ते १० तासांत गाठणे शक्य होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला चालना मिळण्यास मदत होणार आहे. समृद्धी मार्गामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दारी समृद्धी येणार आहे.

जिल्ह्यातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीवर आधारित आहे. २ लाख १० हजार हेक्टरवर लागवड क्षेत्र आहे. यापैकी १ लाख ९० हजार हेक्टरवर धानाची, तर जवळपास १२ हजार हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड केली जाते. धानावर प्रक्रिया उद्योग नसल्याने शेतकऱ्यांना हमीभावाने धानाची विक्री करून मोकळे व्हावे लागते. परिणामी शेतकऱ्यांची फारशी आर्थिक प्रगती झालेली नाही. गेल्या तीन-चार वर्षांपासून शेतकरी ऊस, भाजीपाला, फळबाग लागवडीकडे वळत आहे. ही दिलासादायक बाब आहे. मात्र, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला, फळे मोठ्या बाजारपेठेत पोहोचविण्याच्या जलद सोयी नाहीत. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत त्याची विक्री करून शेतकऱ्यांना समाधान मानावे लागते. त्यातून फारसे उत्पन्नही मिळत नाही. शासनाने समृद्धी महामार्गाचा गोंदियापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेत त्याच्या कामाला सुरुवात केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक आशेचा किरण गवसला आहे. या समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांना जलद वाहतुकीची सोय उपलब्ध होणार आहे. भाजीपाला, दूध, फळे हे लवकर खराब होणारे घटक आहेत. त्यामुळे त्यांची जेवढ्या जलदगतीने वाहतूक होईल, तेवढे सोयीचे होणार आहे. 

शेतमालाला मिळणार बाजारपेठ समृद्धी महामार्गामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नागपूर, मुंबई, नाशिकसह इतर मोठ्या बाजार- पेठेत शेतमाल पोहोचवून चार पैसे अधिकचे पदरात पाडून घेण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा महामार्ग शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणणारा मार्ग ठरणार आहे. सध्या या महामार्गासाठी तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे जमिनीला सोन्याचा भाव आला आहे.

राइस मिल उद्योगाला मिळेल संजीवनी गोंदिया तालुक्यातील बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आहे. या विमानतळावरून कार्गो सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कार्गो सेवा सुरू झाल्यास जिल्ह्यातील राइस मिल उद्योगाला संजीवनी मिळू शकते. शिवाय कृषी क्षेत्राला चालना मिळण्यास मदत होईल. लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील शेतकऱ्यांनाही बिरसी विमानतळावरून शेतमाल बाहेर पाठवून अतिरिक्त नफा मिळविण्यास मदत होईल. त्यातच आता समृद्धी महामार्गाचीसुद्धा मदत होणार आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गgondiya-acगोंदिया