लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय व तालुक्यातील ग्राम चुटिया येथील मुन्नालाल चव्हाण जनता हायस्कूल यांच्या संयुक्तवतीने ‘बालक सेवा विधी सेवा आणि बालकांचे संरक्षण’ या विषयावर कायदेविषयक साक्षरता व जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक एन.के. शेडे यांच्या अध्यक्षतेत आयोजित कार्यक्रमाला नेतराम पारधी, अर्चना नंदनधने, ज्योती भरणे प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पारधी यांनी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण म्हणजे काय व त्याच्या कार्यपद्धतीची ओळख करुन दिली. देशात बालकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून कायद्याच्या कचाट्यात सापडलेली बालके, त्यांची देखभाल व संरक्षणाची गरज असलेली बालके, बालकांना इजा पोहोचविणे, गैरवर्तन करणे, हेडसांळ करणे यापासून संरक्षण मिळण्याचा हक्क आहे. शिक्षण सुद्धा मुलांचा मुलभूत हक्क आहे. जी मुले दुर्गम ग्रामीण भागात राहतात त्यांना कायद्याची मदत हवी असली तरी मिळू शकत नाही, यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मदत करते असे सांगितले.नंदनधने यांनी, वाहतुकीचे नियम व मुलामुलींकडून फोनचा कसा गैरवापर केला जातो याची जाणीव करुन दिली. भरणे यांनी, शासनाच्या मनोधैर्य योजनेची माहिती देतांना बलात्कार, बालकावरील लैंगिक अत्याचार, अॅसिड हल्ला प्रकरणात प्रतिष्ठा व आत्मविश्वास प्राप्त करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत शासनाकडून दिली जाते याची माहिती करुन दिली.कार्यक्रमाला जी.जी. बघेले, आर.एस. कदम, आर.पी.कटरे, आर.व्ही.कापगते, व्ही.जे. टेंभरे, एस. के. शेंडे, डी.पी. मेश्राम, बी.यू. भक्तवर्ती, डी.एच. रहांगडाले इतर कर्मचारी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. संचालन बी.एन. शेंडे यांनी केले. आभार कापगते यांनी मानले.
विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:28 AM
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय व तालुक्यातील ग्राम चुटिया येथील मुन्नालाल चव्हाण जनता हायस्कूल यांच्या संयुक्तवतीने ‘बालक सेवा विधी सेवा आणि बालकांचे संरक्षण’ या विषयावर कायदेविषयक साक्षरता व जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्देचुटिया येथील कार्यक्रम : विविध कायद्यांबाबत दिली माहिती