विकासाच्या कामाकडे ग्राम पंचायतची पाठ
By admin | Published: August 25, 2016 12:22 AM2016-08-25T00:22:23+5:302016-08-25T00:22:23+5:30
मुंडीकोटा हे गाव केंद्राचे ठिकाण असून या गावाची लोकसंख्या अंदाजे ३ ते ४ हजार आहे.
मुंडीकोटा : मुंडीकोटा हे गाव केंद्राचे ठिकाण असून या गावाची लोकसंख्या अंदाजे ३ ते ४ हजार आहे. या ठिकाणी सर्वात मोठे सचिवालय आहे. ग्राम विस्तार अधिकारी या ठिकाणी कार्यरत आहेत. पण सरपंच व सचीव यांच्या कारभारामुळे विकासाच्या कामाला खिळ बसली आहे.
मुंडीकोटा येथे सोमवारी आठवडी बाजार ग्रा.पं. कार्यालयाच्या समोर भरतो. पण बाजारांच्या जागेत घाणच घाण पसरलेली असते. जुन्या दवाखान्याच्या इमारतीजवळ कोंबडी व मच्छी मटनाचे दुकाने असून त्याठिकाणी कोंबड्याचे पंख पडलेले असते त्यांची दुर्गंधी येत असते. त्यामुळे त्या परिसरातील राहणाऱ्या व्यक्तींना आजारी पडण्याची पाळी आली ओह. आठवडी बाजार संपल्यानंतर सडका भाजीपाला त्या ठिकाणी पडून राहते. पण त्यांची विल्हेवाट लावण्यात येत नाही.
मुंडीकोटा गावात अतिक्रमण वाढले. गावात मुख्य मार्गावर अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रस्त्याला लागत व्यापारांचे दुकाने आहेत त्यांनी आपल्या दुकानासमोर टिनाचे शेड लावलेले आहेत. पण या मुख्य रस्त्यावर खूप वर्दळ असते. या मुख्य मार्गावर दोन मोठ्या राईस मिल आहेत. त्यामुळे दररोज मोठ्या वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्यावर केव्हाही अपघात होऊ शकते. ग्रा.पं.मुंडीकोटा व्यवसाय कर वसूल करीत असते. ग्रा.पं.दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
स्मशान शेड नाही. त्यामुळे मुंडीकोटावासी प्रेत भंभोडी नाल्याच्या काठावर उन्हाळ्यात व पावसाळ्यात उघड्यावर जाळत असतात. पावसात प्रेत नेण्यास अनेकांची फजिती होत असते. सिमा भंभोडी गावाची असून त्याठिकाणी प्रेत जाळणे फार चुकीचे आहे. त्यामुळे भंभोडी येथील येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींना भितीचे वातावरण दिसत असते.
जनावरे चराईसाठी जागा नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडीकोटाच्या मागे जनावरे चराईची जागा उपलब्ध होती. पण जागेवर मुंडीकोटा ग्रा.पं.ने अदानी तिरोडा येथील खराब राख टाकून त्या जागेचे सपाटीकरण केले आहे. त्यामुळे यावेळी ग्राऊंड झालेले दिसत आहे. त्यामुळे यावेळी जनावरे चराईची जागा राहली नाहीत. त्यामुळे जनावरे कुठे चारणार असा प्रश्न गोपालकांसमोर आहे.
जवाहर रोजगार योजनेंतर्गंत मुंडीकोटा ग्रा.पं.ने सन १९९३ ते १९९४ मध्ये ४ शॉपींग सेंटर तयार केले होते. ते शॉपींग सेंटरच्या खोल्या मुंडीकोटा येथील गरजू व्यक्तींना भाड्याने देण्यात आल्या. पण त्या शॉपींग सेंटरचे वरचे छत पावसाळ्यात गळत आहेत. सिमेंटचे पोफडे खाली पडत आहेत. याविषयी खोलीत राहणाऱ्या व्यक्तीनी ग्रा.पं. मुंडीकोटा यांचेकडे तक्रार केली. पण ती तक्रार धुळखात पडलेली आहे. दोन महिने लोटूनही काहीच सुधारणा करण्यात आली नाही.
यशवंत ग्राम सुधार समृध्दी योजनेंतर्गत ६ शॉपींग सेंटर सन २००२ ते २००३ यावर्षी ग्रा.पं.मुंडीकोटा यांनी तयार केले होते. ते शॉपींग सेंटर मुंडीकोटा येथील गरजू व्यक्तींना भांड्याने देण्यात आले. पण ६ पैकी फक्त ३ शॉपींग सुरू असतात तर ३ शॉपींग नेहमीच बंद आहेत. त्या ३ शॉपींगवाल्याकडे बरेच वर्षापासून थकीत रक्कम बाकी आहे. पण त्यांनी भाडे न देता आपलाच कुलूप लावून ठेवलेला आहे. मुंडीकोटा ग्रा.पं.ने आतापर्यंत कोणत्याच प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे ग्रा.पं.वर भूर्दंड बसत आहे. संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोषीवर कारवाई करण्याची मागणी आहे.(वार्ताहर)