पक्षकारांना केंद्रबिंदू मानून योग्य न्याय मिळवून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 09:16 PM2019-06-22T21:16:31+5:302019-06-22T21:17:44+5:30
भारतीय राज्यघटना ही भारतीयांसाठी एक महत्त्वाचा दस्ताऐवज आहे. राज्यघटनेच्या माध्यमातून देशात लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आली आहे.लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून न्यायपालिका ही नि:पक्षपणे न्याय देण्याचे काम करते. मार्ग काढला तर निश्चितच मार्ग निघतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : भारतीय राज्यघटना ही भारतीयांसाठी एक महत्त्वाचा दस्ताऐवज आहे. राज्यघटनेच्या माध्यमातून देशात लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आली आहे.लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून न्यायपालिका ही नि:पक्षपणे न्याय देण्याचे काम करते. मार्ग काढला तर निश्चितच मार्ग निघतो. पक्षकारांना केंद्रबिंदू मानून त्यांना योग्य न्याय मिळवून देऊन न्याय व्यवस्थेला प्रगतीपथावर न्यावे.असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी केले.
सडक अर्जुनी येथील दिवाणी व फौजदारी न्याययालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन शनिवारी (दि.२२) करण्यात आले. या वेळी ते उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने हे होते. या वेळी प्रामुख्याने नगराध्यक्ष देवचंद तरोणे, पोलीस अधीक्षक विनीता शाहू, जिल्हा न्यायाधीश एस.बी.पराते, जिल्हा न्यायाधीश अमित जोशी, भंडाऱ्याचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश खुणे आणि शर्मा, सहदिवाणी न्यायाधीश गोंदिया एन.आर.वानखडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एम. बी. दुधे, मुख्य न्यायदंडाधिकारी गोंदिया एन.जी.देशपांडे, सहायक संचालक सरकारी अभियोक्ता चंदन रणदिवे, गोंदिया जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. टी. बी. कटरे, वकील संघाचे सचिव अॅड. सचिन बोरकर, सडक अर्जुनी वकील संघाचे सचिव डी.एस.बंसोड तसेच अॅड. एस. बी. गिºहेपुंजे, अॅड.गहाणे, अॅड. रहांगडाले, अॅड. अनमोल राऊत, अॅड. पोर्णिमा रंगारी,सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता गाणार, उपअभियंता लांजेवार उपस्थित होते. न्यायमूर्ती गिरटकर म्हणाले, गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात न्यायालयाची स्वतंत्र इमारत तयार व्हावी, यासाठी सतत पाठपुरावा करु न प्रयत्न केले. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमध्ये सुसज्ज अशी न्यायालयाची इमारत तयार झाली आहे. देवरी तालुका न्यायालयाच्या इमारतीसाठी काही प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्या अडचणी सुध्दा आता दूर झाल्यामुळे देवरी येथील न्यायालयाच्या इमारत बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे सांगितले.
गोंदिया व भंडारा येथील वकीलांमध्ये जागरुकता आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य समजून पक्षकारांना पारदर्शकपणे न्याय देण्याचा प्रयत्न करावा. जिल्ह्याच्या न्यायव्यवस्थेतील काही अडचणी असल्यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी समन्वयाचा मार्ग काढून योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले. न्यायाधीश सुहास माने म्हणाले, तालुका न्यायालयाची इमारत ही यापूर्वी भाड्याच्या इमारतीत होती. सन २०१६ मध्ये या इमारतीच्या बांधकामाला सुरु वात करण्यात आली व २०१९ मध्ये ही इमारत पूर्णत्वास आली. आता या सुसज्ज अशा न्यायालयाच्या नवीन इमारतीत न्यायव्यवस्थेतील अधिकाºयांनी नेहमी सतकर्म करीत रहावे. प्रत्येक खटला हा लवकरात लवकर कसा संपवता येईल याकडे लक्ष केंद्रीत करु न न्यायालयाचे पावित्र्य कायम ठेवावे.
यावेळी सडक अर्जुनीचे दिवाणी न्यायाधीश एन.आर.ढोके यांनी मनोगत व्यक्त केले. मंचावर उपस्थित मान्यवरांना स्मृतीचिन्ह म्हणून भारताचे संविधान हा ग्रंथ भेट देण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सडक अर्जुनी तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड.राजेंद्र लंजे यांनी केले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड.दिलीप कातोरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार देवरी तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड.पी.एन.संगीडवार यांनी मानले.