जीवनशैलीतील बदलामुळेही कर्करोग
By admin | Published: January 1, 2015 11:05 PM2015-01-01T23:05:00+5:302015-01-01T23:05:00+5:30
काही काळापूर्वी अॅमोनिया आजार पहिल्या क्रमांकावर होता. आता पहिल्या क्रमांकावर हृदयरोग तर दुसऱ्या क्रमांकावर कर्करोग आहे. कर्करोग हा धुम्रपान व तंबाखू आदी वस्तुंच्या आहारातून होते,
७० टक्के मृत्यू ३० ते ६९ वयोगटात : करटी बु. समूह साधन केंद्रात मार्गदर्शन
काचेवानी : काही काळापूर्वी अॅमोनिया आजार पहिल्या क्रमांकावर होता. आता पहिल्या क्रमांकावर हृदयरोग तर दुसऱ्या क्रमांकावर कर्करोग आहे. कर्करोग हा धुम्रपान व तंबाखू आदी वस्तुंच्या आहारातून होते, असे नसून कुणालाही कोणत्याही वयामध्ये होवू शकतो. जीवनशैलीत होणारे बदलच कर्करोगाची वाढ होण्यास कारणीभूत आहे, असे मत ग्लोबल एज्युकेशन ट्रस्टच्या डॉ. भारती यांनी व्यक्त केले.
गोंदिया जि.प.च्या सहमतीने पंचायत समितीच्या केंद्रस्तरावर कर्करोग (कॅन्सर) यावर जागृती व मार्गदर्शन मेळावा तिरोडा तालुक्यातील करटी बु. येथील समूह साधन केंद्रात पार पडला. यावेळी डॉ. भारती चित्रफीतच्या माध्यमातून केंद्रांतगरत शिक्षकांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, कर्करोगाने ७.४ मिलियन लोकांचा मृत्यू होतो. ७० टक्के मृत्यू ३० ते ६९ वयोगटात होतो. एखादा कर्मचारी किंवा नोकरदार जेवढे रूपये आपल्या सेवाकाळात कमावतो, त्यापेक्षा १० पट अधिक रूपये या आजारावर खर्च होतात. कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. याची जाणीव घरी व समाजात घालावी,असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. (वार्ताहर)